वाढत्या गुन्हेगारीला मुख्यमंत्रीच जबाबदार:डॉ. विश्वजित कदम

Date:

पुणे काँग्रेसला नवी उभारी देणार; दोन्ही शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करतील:
– डॉ. विश्वजित कदम

पुणे : काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. पुणे शहर, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, महिला व चिमुरड्यांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. “राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते आणि गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. अनेक प्रकरणांमध्ये केवळ जलदगती न्यायालयांची घोषणा झाली, परंतु प्रत्यक्षात किती जणांना न्याय मिळाला, असा सवाल करत राज्य सरकार झोपले आहे की जागे, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरात पहिल्यांदाच पूर्व व पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. हे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच, पुण्याचे पुढील महापौर व खासदार हे काँग्रेसचेच असतील, असा दावाही नवनियुक्त शहराध्यक्षांनी या प्रसंगी केला.
नुकतीच पुणे शहर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी व पुणे पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनीही डॉ. कदम यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. या पदग्रहण समारंभास माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, शानी नौशाद, अमिर शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, नगरसेवक विशाल मलके, नगरसेवक सुनिल शिंदे, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका वैशाली भालेराव, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका अश्विनी लांडगे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, उस्मान तांबोळी, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, संजय मोरे, अस्लम बागवान, अनिल सोंडकर, सचिन आडेकर, सतिश पवार, लता राजगुरू, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, एन.एस.यु.आय. अध्यक्ष अभिजीत गोरे, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, लता राजगुरू, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रमेश सकट, राजू ठोंबरे, प्रदिप परदेशी, मोहसिन शेख, मजहर मणियार, विक्रम खन्ना, सुरेश कांबळे, गणेश गुगळे, अमित कांबळे, संजय मानकर, मतिन शेख, ॲड. राजश्री अडसूळ, सचिन दुर्गाडे, ऋषिकेश जाधव, चेतन पडवळ, हर्षद हांडे, देविदास लोणकर, अविनाश अडसूळ, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, ‘संघटन सृजन’ या देशव्यापी अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. केंद्रीय निरीक्षकांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून तयार केलेल्या अहवालाच्या आधारे या दोन्ही अनुभवी नेत्यांची निवड करण्यात आली आहे. चवधरी यांनी विधान परिषदेतही काम केले असून, हे दोन्ही शहराध्यक्ष पुणे काँग्रेसला निश्चितच नवी उभारी देतील. शहरातील वाहतूक कोंडी, बिघडलेलीकायदा-सुव्यवस्था आणि पाणीटंचाई या सत्ताधारी भाजपच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंधन दरवाढ आणि युवकांचा अपमान
केंद्रातील भाजप सरकारने निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला. “आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती मुळे इंधन दरावर परिणाम होणार याची कल्पना असूनही सरकार केवळ निवडणुकांमध्ये मग्न होते आणि मतदान संपताच अवघ्या ४८ तासांत दरवाढ करण्यात आली,” असे ते म्हणाले. याशिवाय, देशातील युवा शक्तीला ‘झुरळ’ म्हणून हिणवणे हा युवकांचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

‘नीट’ पेपर फुटीबाबत केंद्रावर निशाणा
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीवर बोलताना डॉ. कदम यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात असा कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रारंभी काँग्रेस भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी, स्व. इंदिराजी गांधी, स्व. यशवंतराव चव्‍हाण, हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांस डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक वंदे मातरमने झाली.
याप्रसंगी पुणे पश्चिमचे अध्यक्ष दीप्ती चवधरी व पुणे पूर्वचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या निवडीबाबत पक्षनेत्यांचे आभार मानून, पुणेकरांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलने करेल व आगामी काळात पुण्यात अनुकूल बदल घडवून आणेल असे म्हटले.
कार्यक्रमास कार्यकर्त्यांने मोठी गर्दी केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्ट मॅरेज झालेल्या पत्नीला हळदीच्या दिवशीच माहेरच्यांनी पळवले, पतीची पोलिसांत धाव

मुलगा 'बौद्ध' (दलित) समाजाचा आहे म्हणून... कोर्ट मॅरेजनंतर कुटुंबीयांनी रचला...