वनराज आंदेकर हत्येचा बदला:मुख्य आरोपीच्या भावावर गोळ्या झाडल्या अन् कोयत्यानेही केले वार ..बालाजीनगरमध्ये सकाळची घटना

Date:


पुणे- वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बालाजी नगर परिसरात घडली असून, शहरात खळबळ उडाली आहे.मृत तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय 26, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे आहे. हल्लेखोरांनी बालाजी नगर येथे दबा धरून अक्षयवर जवळून गोळ्या झाडल्या. त्याला तीन गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर त्याच्या तोंडावर आणि डोक्यात धारदार कोयत्याने वारही करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार,अक्षय बापू मस्के ऊर्फ बाळा Akshay Bapu Maske alias Bala (वय २६, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, आंबेगाव पठार) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. ही घटना बालाजीनगर येथील संविधान चौकात बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली. अक्षय म्हस्केवर यापूर्वी तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते, परंतु तो त्यातून बचावला होता. मात्र, चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. मृत अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हत्येसाठी लागणारे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून पुण्यात आणले होते.आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आणि ‘फिल्डिंग’ लावण्यात सोमा गायकवाड व आकाश म्हस्के यांचा सहभाग होता. त्यानंतर आंदेकरांवर गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती.

आकाश म्हस्के सध्या कारागृहात आहे. त्याच्या कृत्याचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याचा भाऊ अक्षय म्हस्केला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

SBI ला नकली सोने देऊन सवाचार कोटीची फसवणूक मोक्ष जैन आणि चिराग हिम्मतलाल जैन यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी व्हॅल्युअर म्हणून काम करत असताना...

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू; सिंहगड रोडवरील सोसायटीतील धक्कादायक घटना

पुणे : सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगरमधील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये...

भारतातील सर्वात मोठ्या रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती

‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद पुणे...

सामाजिक बांधिलकी जपत महापौरांचा वाढदिवस साधेपणात साजरा

पुणे : आजच्या काळात वाढदिवस म्हटला की मोठे बॅनर्स,...