आबा बागुल, राणी भोसले, महेश वाबळे सह धनकवडी- सहकारनगर मध्ये 59 अर्ज दाखल

Date:

पुणे:

धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आज सोमवार (ता. २९) दुपारी तीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ३६,३७ आणि ३८ मधील साधारण ५९ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज उत्साहात दाखल केले.
अनेक इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म अद्याप न मिळाल्याने उद्या शेवटच्या दिवशी फॉर्म देण्याचे कबूल करत आपले अर्ज दाखल केले. इच्छित पक्षांकडून एबी फॉर्म न मिळाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी दिसून आली. तसेच ज्यांना एबी फॉर्म मिळाले त्यांनी मात्र वाजत गाजत आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याचे चित्र दिसून आले. महापालिकेतील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ मधून शिवसेनेचे आबा बागूल, भाजप चे उमेदवार महेश वाबळे, संदीप बेलदरे, राणी भोसले यांनी आपले अर्ज दाखल केले. परंतु शिवसेना आणि भाजपा युती जागा वाटपावरून अडलेली चर्चा यामुळे अनेक इच्छुकांवर टांगती तलवार असल्याचे दिसते आहे. अर्ज स्विकृतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर, सहायक अधिकारी सुरेखा भणगे, मनीषा भूतकर यांनी काम पाहिले.

काही उमेदवारांनी पक्षाच्या अर्जाबरोबरच अपक्ष अर्ज देखील दाखल करत सावध भूमिका घेतली आहे. जागा वाटपाचा रंगलेला कलगी तुरा उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत किती रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर आजच्या रात्रीत पुलाखालून किती पाणी जाणार आहे हे मात्र चर्चेचा विषय ठरेल. पुण्यातल्या वाढत्या थंडीत पक्षांतर आणि चिन्हांतर या दोन गोष्टींचा गरम विषय प्रभागात चर्चीला जातो आहे.
प्रभागनिहाय दाखल झालेले अर्ज (आरक्षणासह)

प्रभाग क्रमांक : ३६ (सहकारनगर- पद्मावती)

अ (अनुसूचित जाती) -०७

ब ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)- ०७

क ( सर्वसाधारण महिला) – ०२

ड (सर्वसाधारण)- १०

प्रभाग क्रमांक : ३७

अ ( नागरिकांचा मागास प्रवर्ग )- 00

ब ( सर्वसाधारण महिला) – ०३

क ( सर्वसाधारण महिला ) – ०२

ड ( सर्वसाधारण) – ०२

प्रभाग क्रमांक : ३८ ( बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज )

अ ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ) – ०५

ब ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) – ०४

क ( सर्वसाधारण महिला) – ०५

ड ( सर्वसाधारण महिला) – ०२

इ ( सर्वसाधारण )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...