- राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष उपस्थित विधीमंडळात ३ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन
- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची माहिती
मुंबई – विधान भवन, मुंबई येथे आज भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष,ॲड.राहूल सुरेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या व सर्वांचे अभिनंदन केले. पुढील वर्ष स्वतंत्र, सुरक्षितता आणि विकास यांचं जावो असा शुभेच्छा संदेश याप्रसंगी डॉ.गोऱ्हे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात जे मुद्दे मांडले ज्यामध्ये महिला सुरक्षितता याचबरोबर समान नागरी कायदा याचा देखील उल्लेख केला आहे. कुठलीही प्रकारचा जात भेद आणि धर्म यामुळे भेदाभेद नको अशी भूमिका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे.
त्यामुळे समान नागरी कायदा हा कुठल्याही धर्माचे अधिकार काढून घेण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नसून, सर्व धर्मातील महिलांना घटस्फोट, वारसा कायदा, संपत्ती वारसा या सगळ्यासाठी कुठलेही अन्यायकारक कायदे नसावे, यासाठी हा कायदा असल्याचे यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच समान नागरी कायद्याचा उल्लेख करून सर्व महिलांना निरपेक्ष न्यायाचे वचन दिल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले
विधानसभेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या ३ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू विधीमंडळात येणार आहे.यानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिली.