पुणे:
शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.तसेच राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कार जाहीर झाले आहे. ते सध्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत
गुन्हेगारांवर दबदबा असलेल्या गोवेकर यांनी त्यांच्या सेवा कालावधीत अतिशय क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.सतीश गोवेकर यांनी बहुचर्चित नयना पूजारी खून प्रकरणातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपींना अटक केली होती. तसेच, ललित पाटील ड्रग प्रकरणाचा पर्दाफाश करीत आरोपींना अटक करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. गोवेकर हे १९८८ बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. त्यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
गोवेकर यांनी दत्तवाडी, कोंढवा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. २०१७ मध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त या पदावर पदोन्नती झाल्यानंतर प्रथम राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई तसेच पुणे शहरात फरासखाना विभाग आणि सध्या गुन्हे शाखेत कर्तव्य बजावत आहेत.
त्यांनी पोलिस दलात ३६ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवा कालावधीत त्यांना ५०३ बक्षीसे मिळालेली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना २००८ मध्ये पोलिस महासंचालक पदक, २०११ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे.
.