“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकांबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे आणि कुणीही करु नये” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.महापुरुषांविरोधात कुणीही वक्तव्य करु नये, असा सल्ला फडणवीस यांनी भिडेंना दिला आहे.
“अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाही. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वांतंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत, जसे महात्मा गांधींबद्दल कोणी बोलले कि कॉंग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात तसे सावरकरांच्या विषयी राहुल गांधी बोलले कि त्यांचा हि निषेध करायला त्यांनी पुढे आले पाहिजे त्यावेळी मात्र ते मिंधे होतात असा प्रतिवार देखील फडणवीस यांनी केला .