· या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाचे नामवंत सेलिब्रेटीजच्या सहभागासह बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोचीन, पुणे आणि जयपूर येथे आयोजन
· सहभागींसाठी मोटरसायकल प्रदर्शन, ग्रुप राइड्स, तांत्रिक पैलूंवर वर्कशॉप्स आणि तज्ज्ञांसह चर्चा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
· सर्व वयोगटातील रायडर्सना एकत्र येऊन मोटरसायकलविषयी त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची तसेच आपल्या लाडक्या बाइकवरून केलेल्या भटकंतीचे किस्से सांगण्याची मिळाली अनोखी संधी
पुणे, १० जुलै २०२३ – रविवारी मोटरसायकल प्रेमी आणि व्हिटेंज बाइकचे चाहते २१ वा आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात गेल्या कित्येक दशकांपासून रायडर्सची मने जिंकणाऱ्या जावा आणि येझ्दी मोटरसायकलच्या वारसा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोचीन, पुणे आणि जयपूर अशा वेगवेगळ्या शहरांतील १०,००० पेक्षा जास्त मोटरसायकलप्रेमी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचे आयोजन मोटरसायकल प्रेमी, विविध मोटरसायकल क्लब आणि कम्युनिटीजतर्फे करण्यात आले होते. जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सचा वारसा जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहाणाऱ्या सहभागींनी मीट-अप्स, ग्रुप राइड्स, प्रदर्शन आणि अशा बऱ्याच उपक्रमांचे आयोजन केले होते.
यावर्षी आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सर्व वयोगटातील रायडर्स त्यांच्या लाडक्या मोटरसायकल्ससह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या लिजंडरी बाइक्सच्या बऱ्याच आठवणी आणि किस्से सांगितले. यावेळी खास मांडण्यात आलेल्या व्हिंटेज जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सचा समृद्ध इतिहास आणि बांधणी पाहायला मिळाली. या वैशिष्ट्यांमुळेच या मोटरसायकल्स गुणवत्तेचे कालातीत प्रतीक मानल्या जातात.
सहभागींनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल जावा येझ्दी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष सिंग जोशी म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचं हे सेलिब्रेशन या मोटरसायकल्सनी भारतीय रायडर्सवर किती सखोल प्रभाव टाकला आहे याची साक्ष देणारं आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणच्या जावा आणि येझ्दी मोटरसायकल प्रेमींचा उत्साह आणि प्रेम पाहायला मिळाला. आम्ही एकत्रितपणे या दोन्ही आयकॉनिक मोटरसायकल्सचा वारसा नव्याने साजरा करण्यासाठी त्यांची बांधणी पुनरूज्जीवित करत आहोत. या कार्यक्रमात केवळ या मोटरसायकल्सची परंपरा जपली गेली, शिवाय, साहस आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला त्यांचा वारसा जतन करण्यात आला.’
दिवसभरात सहभागींनी मुक्त चर्चेत भाग घेतला, एकमेकांबरोबर तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण केली तसेच जावा आणि येझ्दी मोटरसायकलने त्यांना दिलेला आनंद साजरा केला. उपस्थितांना रिस्टोअर्ड क्लासिक्स, दुर्मीळ मॉडेल्स व कस्टमाइज्ड बाइक्स पाहाण्याची संधी यावेळी मिळाली. या क्लासिक मोटरसायकल्सच्या मालकांनी अभिमानाने त्यांच्याजवळ असलेली सर्वात दुर्मीळ आणि मौल्यवान मॉडेल्स उपस्थितांना पाहाण्यासाठी खुली करून दिली. यावेळी कंपनीने रायडर्स कम्युनिटीसाठी नवे अप लाँच केले. या अपच्या माध्यमातून रायडर्सना त्यांचे अनुभव मांडता येतील तसेच त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या सफरींमध्ये सहभागी होता येईल.
या कार्यक्रमात क्लासिक कलेक्टर एडिशनच्या मोटरसायकल्स पाहायला मिळाल्या. त्यामध्ये ओरिजनल सीझेडपासून बेंगळुरूमध्ये मांडण्यात आलेल्या अद्ययावत येझ्दी रोडकिंग्जपर्यंत वेगवेगळ्या मोटरसायकल्सचा समावेश होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून ४०० पेक्षा जास्त व्हिंटेज जावा आणि येझ्दी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचे यश या मोटरसायकल्सची लोकप्रियता अजून टिकून असून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रायडर्सची संख्या वाढत असल्याचे सांगणारे आहे. मोटरसायकल्स प्रेमी मोठ्या उत्साहाने या वार्षिक कार्यक्रमाची वाट पाहात असतात, कारण या निमित्ताने जावा व येझ्दी मोटरसायकल्सचा वारसा साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त रायडर्स व चाहत्यांना एकत्र येण्याची संधी मिळते.