अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मुंबई- अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहेराज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
मी अजित अनंतराव पवार शपथ घेतो की…अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री; शिंदे-फडणवीसांसमोर शपथविधी
राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
अजित अनंतराव पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीपराव वळसे पाटील – मंत्री
हसन मुश्रिफ – मंत्री
धनंजय मुंडे – मंत्री
धर्मरावबाबा आत्राम – मंत्री
आदिती तटकरे – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री
जे घडले ते महाराष्ट्राच्य हिताचे- फडणवीस
शपथविधीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज जे घडले ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा नवीन अध्याय लिहू. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती देऊ. राज्याला अतिशय प्रगल्भ सरकार देऊ.
आमचे आता ट्रिपल इंजिन सरकार- शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे पूर्वी डबल इंजिनचे सरकार होते. ते आता ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. आमच्या डबल इंजिनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेचाच फायदा होणार आहे.