मंदिराच्या २८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन : छप्पन भोग नैवेद्य अर्पण
पुणे : शनिवार पेठेतील श्री ओंकारेश्वर मंदिराच्या २८५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिमालयातील १००१ वनस्पतींचा जलाभिषेक शिवलिंगावर करण्यात आला. काशी येथील पाच पंडितांच्या पौरोहित्याखाली वनस्पतींचा जलाभिषेक झाला. छपन्न भोग नैवेद्य देखील यावेळी अर्पण करण्यात आला. मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती.
कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, विश्वस्त गंगाधर लोणकर, रोहीत लोणकर, गौरव बापट, सल्लागार मंडळातील मिथिलेश राॅय, विशाल घरत आदी यावेळी उपस्थित होते. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य रमेश कापले, पं. अविनाश त्रिपाठी, पं. मानंजय दीक्षित, पं. पंकज शुक्ला, पं. प्रीतम पाठक हे पंडित सहभागी झाले होते.
सायंकाळी ६.३० वाजता ॠत्विक लोणकर या ९ वर्षाच्या कलाकाराचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला. संपूर्ण दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ८ वाजता महाआरती देखील करण्यात आली.