Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एमटीडीसी सोबत लुटा वर्षा पर्यटनाचा आनंद, मिळणार खास सोयी आणि सवलती…

Date:

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, आल्हाददायक गुलाबी थंडी आणि वर्षा-पर्यटन हे अनुभवायचं असेल तर पर्यटनाला जावंच लागेल…..
अरबी समुद्रात रेंगाळलेल्या पावसानं थोडी गती घेतली कि हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता यासाठी पर्यटन करायचंय, मग या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निसर्गरम्य ठिकाणं आपणास साद घालीत आहेत. फक्त शासनानं दिलेल्या सुचनांच पालन करायचं आणि धोकादायक ठिकाणी न जाता पर्यटनाचा आनंद लुटायचा….
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे आणि निसर्गरम्य परिसरात असलेली जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे ……
निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेची ठिकाणे तसेच जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. महामंडळाची छत्रपती संभाजीनगर विभागातील अजंठा येथे अजंठा टी पॉईंट आणि फर्दापुर, लोणार येथील पर्यटक निवास आणि लवकरच पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असलेले पर्यटक निवास वेरूळ ही पर्यटक निवासे निसर्गरम्य परिसरात आहेतच, त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले आणि अनुपम केलेचा उत्कृष्ट नमुना असलेली अजंठा लेणी, संपुर्ण एका दगडामध्ये कोरलेली वेरुळची मंदीरे आणि लेणी, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर, ही ठिकाणं आणि इथं असणारी निसर्गसंपदा, धबधबे यांच सौदर्य डोळयांत साठविण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या सर्व पर्यटकांच्या आरामदायी वास्तव्याची आणि चवादर भोजनाची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये करण्यात येत आहे. महामंडळाची ही पर्यटक निवासे वर्षा पर्यटनासाठी सर्वतोपरी सज्ज करण्यात आली असुन याठिकाणी पर्यटकांना सर्व सोयी उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. तथापि, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासुन सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरडया धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असुन त्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत.
नयनरम्य अशा मनोहारी लोणार सरोवराच्या सानिध्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास लोणार असुन या ठिकाणी 8 अद्ययावत असे वातानुकुलित सुट पर्यटकांना सेवा देत आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या परिसरामध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासात चवदार भोजनाची सोय करण्यात येत आहे. अजंठा लेण्यांच्या पसिरात आणि जवळच फर्दापुर येथे महामंडळाकडुन आरामदायी अशा कॉटेज बांधलेलल्या आहेत. लेण्यांपासुन जवळच असल्याने सदरची पर्यटक निवासांचे पर्यटक मोठया प्रमाणावर आरक्षण करताना दिसत आहेत. सदर पर्यटक निवासांच्या ठिकाणी प्री-वेडींग फोटोशुट, डेस्टिनेशन वेडींग, कंपन्यांच्या कॉन्फरन्स यासाठी महामंडळाकडुन सोय करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अशा निसर्गरम्य वारसा स्थळांच्या ठिकाणी कॉन्फरन्स घेण्यासाठी वेगवेगळया कंपन्या नियोजन करीत असुन अशा कंपन्यासाठी महामंडळ एकत्रित रूम बुकिंगवर सवलत देत आहे. डेस्टिनेशन वेडींगसाठीही महामंडळ खास सवलत देत असुन निसर्गाच्या सानिध्यात विवाह करण्यासाठी आणि या आठवणी यादगार करण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.
महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही सुसज्ज असे 83 सुटचे पर्यटक निवास आहे. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग साठी खास लॉन ची सोय करण्यात आली असुन सुसज्‍ज असा कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचीही सोय करण्यात आली आहे.
सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत असुन पर्यटकांनाही धोकादायक ठिकाणी वर्षापर्यटनास न जाण्यासाठी सुचना देण्यात येत आहेत.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्‍यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “टुर पॅकेजची” सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. सोयी सवलतींमुळे आणि वर्षा ऋृतुतील आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनासाठी उत्साह दिसुन येत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा पर्यटनास बहर येणार आहे.
आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत पर्यटक निवासाच्या बुकिंगच्या अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानी खासदार पलवाशा खान बरळल्या – बाबरीची पहिली वीट पाक सैनिक लावणार:असीम मुनीर देणार अज़ान

इस्लामाबाद-पाकिस्तानमधील बिलावल भुट्टो यांच्या पक्षाच्या नेत्या पलवाशा खान यांनी...

टायटन वॉचेसचे नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन

अचूकपणा ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे अर्थपूर्ण शैलीतून स्वतःला अभिव्यक्त करू इच्छितात अशा पुरुषांसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन बंगलोर, : मेकॅनिकल विश्वाविषयी पुरुषांना वाटणारे आकर्षण सर्वश्रुत आहे. हे आकर्षण घड्याळांमध्ये साकार करून टायटन वॉचेसने आपले नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन सादर केले आहे. मेकॅनिकल वॉचमेकिंगचे नाजूक सौंदर्य अधोरेखित करत हे कलेक्शन व्हिजिबल मेकॅनिक्सचा सोहळा साजरा करते. कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळामध्ये मनमोहक स्केलेटल डायल्स आहेत, ज्यामध्ये नाजूक इंजिनीयरिंग हे प्रत्येक शैलीचे सार आहे. इंटिग्रेटेड ब्रेसलेट्सपासून ड्युअल फिनिश सॉलिड लिंक स्ट्रॅप्सपर्यंत प्रत्येक डिझाईन त्यामधून विविध व्यक्तिमत्त्वे प्रतिबिंबित होतील अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. २१ ज्वेल बेयरिंग्स, दर तासाला २१६०० बीट्सची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आणि ४२ तासांचे पॉवर रिझर्व्ह असलेले हे कलेक्शन अचूकपणा, कारीगरी आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करते, चोखंदळ घड्याळप्रेमींसाठी तयार करण्यात आले आहे. टायटनच्या ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये चार अनोख्या श्रेणी आहेत, अनोखी व्यक्तिमत्त्वे दर्शवण्यासाठी त्या खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. यिन यांग स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच या अतुलनीय कलेक्शनचा केंद्रबिंदू आहे, संतुलनाचा कलात्मक सन्मान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, असामान्य यिन यांग स्केलेटल डायल डिझाईन आणि रिफाईंड प्रेस-पॅटर्न डिटेलिंग यामध्ये दर्शवण्यात आले आहे. सुबक स्टेनलेस स्टील आणि शानदार रोज गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असलेली ही श्रेणी औपचारिक वातावरणासाठी उत्कृष्ट आहे. फिनिक्स स्केलेटल ऑटोमॅटिक घड्याळ हे फिनिक्स पक्षापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, हे शक्तीचे आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे प्रतीक आहे. याची बोल्ड स्केलेटल डायल फिनिक्स पक्षाच्या पंखांप्रमाणे नाजूक डिझाईन करण्यात आली आहे. नर्ल्ड क्राऊन याचे सोफिस्टिकेटेड डिझाईन अधिक शानदार बनवतो. मोनोक्रोमॅटिक एक्लिप्स ब्लॅक आणि ऑप्युलँट एम्बर रोज गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्रभावी डिझाईन आणि उत्कृष्ट फिनिश यामुळे हे घड्याळ संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या पेहरावांसाठी आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी उत्तम ठरते. नेक्सस स्केलेटल ऑटोमॅटिकमध्ये आधुनिक सौंदर्य आणि चिरंतन प्रतीकात्मकता यांचा मिलाप आहे. याची अनोखी स्केलेटल डायल जहाजाच्या सुकाणूपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे, जे हालचाली आणि प्रगती दर्शवते, नाजूक ऑटोमॅटिक हालचाली दर्शवते. कॉफी ब्राऊन, गनमेटल आणि मिडनाईट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पोर्टी अपील आणि इंटिग्रेटेड ब्रेसलेट असलेले हे घड्याळ स्मार्ट कॅज्युअल लूक्स आणि दररोज वापरण्यासाठी साजेसे आहे. गोल्डन हार्ट स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच सोनेप्रेमींसाठी बनवण्यात आले आहे. बाय-मेटल आणि फुल गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध असून गिल्टेड स्केलेटल डायलमधून विलक्षण जागरूकतेने तयार करण्यात आलेले बारकावे दिसून येतात. फॉर्मल प्रसंग, समारंभ आणि सांज सोहळ्यांमध्ये तुमच्या पेहरावाला अत्यावश्यक असलेला उठावदार, लक्झरियस स्पर्श देण्यासाठी हे अगदी योग्य आहे. टायटन वॉचेसच्या मार्केटिंग हेड अपर्णा रवी म्हणाल्या, "टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन हा आमच्या वाटचालीतील एक लक्षणीय टप्पा आहे, प्रगत, सोफिस्टिकेटेड होरोलॉजी आणि आधुनिक शैली यांचा समन्वय दर्शवणारी घड्याळे तयार करून नावीन्य घडवत राहण्याप्रती टायटनची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. चोखंदळ आणि शैलीविषयी जागरूक असलेले पुरुष, ज्यांना घड्याळ हे स्व-अभिव्यक्तीचे माध्यम वाटते, अशांसाठी हे तयार करण्यात आले आहे, यांची कारीगरी तुम्ही काहीही बोलण्याआधी खूप काही व्यक्त करते.” प्रत्येक घड्याळामध्ये ल्युमिनस काटे, स्पष्टपणे अप्लाय करण्यात आलेले इन्डायसेस आणि ड्युएल-फिनिश्ड सॉलिड स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्स आहेत, दिवसभर आणि रात्रीदेखील प्रीमियम फील देणाऱ्या या घड्याळांच्या किमती १८,३२५ रुपयांपासून २२,१५० रुपयांपर्यंत आहेत. टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन सर्व टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी देवेन भारती

मुंबई-मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची...