मिरजच्या अपंग बालगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

Date:

पुणे, दि.२८ : अपंग कल्याण आयुक्तालयांतर्गत शासकीय निवासी संस्था, मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या शाळेत मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा देण्यात येते, असे शासकीय अपंग बालकगृह व व शाळेचे अधीक्षक यांनी कळविले आहे.

संस्थेच्या परिसरात इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. इयत्ता ५ वी पासून माध्यमिक शाळेत जाण्या-येण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा देण्यात येते. शाळेमार्फत पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश मोफत देण्यात येतात. तसेच मुलींची काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक नेमले जातात.

वसतीगृहामध्ये मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था, मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास पलंग, गादी, बिछाना व इतर साहित्य, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविल्या जातात. अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकलही दिल्या जातात.

प्रवेशासाठी विद्यार्थी ६ ते १७ वयोगटातील असावा. प्रवेश अर्जासोबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेला अपंगत्त्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व ३ फोटो जमा करणे आवश्यक राहील. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी, मिरज-४१६४१० तसेच संपर्क क्रमांक
९३२५५५५९८१,
९५५२२३४५८६
किंवा
९४२२२१६४५९ येथे संपर्क साधावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष...

किमान ८ कोटीची उलाढाल असलेले केबलवाले आणि होर्डिंग वाले यांच्यासाठी स्थायी विरोधात लढायला ‘फौज’ तय्यार

कोट्ट्याधीशांच्या व्यवसायाला शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवू पाहणाऱ्या निर्णयांना...

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...