चांदुर बाजार–
आम्ही सारे शिवप्रेमी,क्षात्रविर क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व युवराज संभाजी राजे मित्र मंडळ संयोजित प्रसिद्ध असलेल्या राज्यस्तरीय शिवजयंती घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन यावर्षीही होणार आहे. या स्पर्धेची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये नोंद असून आठ वर्षे या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा संपूर्ण राज्यभरात होणार असून,राज्यस्तरावर हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम बक्षीस 21 हजार रुपयांचे असून जिजाऊ बँक,अमरावती व वैभवभाऊ वानखडे,नगरसेवक, तिवसा यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे तर द्वितीय बक्षीस 11 हजारांचे असून स्व.अशोकराव ढगे स्मृतीप्रीत्यर्थ निलेशभाऊ ढगे व शिवश्री निलेश फुटाणे यांच्याकडून देण्यात येणार आहे.
तृतीय बक्षीस 5 हजाराचे असून प्रा.आशिषभाऊ देशमुख (अध्यक्ष, सूर्योदय प्रतिष्ठान, दर्यापूर) यांच्या कडून देण्यात येणार असून चतुर्थ बक्षीस 2 हजार 500 रुपयांचे असून शिक्षणरत्न गो.अ. देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ डॉ.तुषार अ. देशमुख यांच्या कडून देण्यात येणार आहे. या सर्व बक्षिसांसोबत सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येतील. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून 5 ते 16 व 17 ते 30 वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतो. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ.तुषार देशमुख(9730015899) यांच्याशी संपर्क करण्याचे व सहभागी होण्याचे आवाहन आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्रा.मनाली तायडे, लीनता पवार, निखिल काटोलकर, इंद्रजित देशमुख, अजित काळबांडे, सुमित रिठे, सुमित चाटे, प्रद्युम्न जावळेकर, अमर वानखडे, ज्ञानेश तुरखेडे, वैभव ठाकरे, विजय महल्ले, आकाश चिखले, प्रणव अडगोकर यांनी केले आहे.