पथारीचे लायसन,अथवा स्टॉल भाड्याने देणाऱ्यांना माधव जगतापांचा दणका , ३०० परवाने रद्द करणार

Date:

पुणे : स्टॉल, पथारी यांचे परवाने महापालिकेकडून मिळवून स्वतः व्यवसाय न करता याच परवान्यावर इतरांना व्यवसाय करण्यास मुभा देऊन त्यापोटी त्यांच्याकडून दरमहा भाड्याच्या नावाने वसुली करणाऱ्या ३०० जणांना आता अतिक्रमण निर्मुलन खात्याचे प्रमुख माधव जगताप दणका देणार आहेत.पाठरेचे परवाने इतरांना भाड्याने देण्याचा धंदा करणारे हे बहुधा राजकीय कार्यकर्ते असल्याने हा विषय पुन्हा वादाचा ठरू शकणार आहे.

नियमांचे उल्लंघन करून भाडेकरू ठेवणाऱ्या पथारी व्यावसायिकांविरोधात महापालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ३०० पथारी व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या काही दिवसांत ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अधिकृत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना वार्षिक शुल्क भरून प्रमाणपत्र दिले जाते. ज्या व्यक्तीच्या नावावर प्रमाणपत्र आहे आणि ज्या व्यावसायासाठी प्रमाणपत्र दिले आहे, त्या व्यक्तीने तोच व्यावसाय करणे तरतूदीनुसार बंधनकारक आहे. मात्र, अनेक पथारी व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करत भाडेकरू ठेवल्याच्या तक्रारी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सातत्याने करण्यात आल्या होत्या.

भाडेकरू ठेवल्यास नियमांचे भंग केल्याप्रकरणी पहिल्या वेळी एक हजार रुपये दंड, दुसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यानंतरही भाडेकरू ठेवल्यास प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत व्यावसायिक आणि त्याच्याकडील प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यानुसार पोटभाडेकरू ठेवणाऱ्या ३०० व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले. यापुढे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सातत्याने प्रमाणपत्राची पाहणी करणार आहेत, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२६: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले. महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.