सोलापूर – नुकतेच सोलापूर चे ख्यातनाम गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांची सोलापूर चे ब्रंन्ड अंम्बेसिटर म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रशासन व मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा हस्ते सोलापूर ब्रंड अम्बेसिटर निवड पत्र देण्यात आला. मोहम्मद अयाज यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली अयाज यांनी कलेच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्यच नांव देश विदेशात लौकीक केले .कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केले आहे सोलापूर जिल्हा व्यसन मुक्ती व राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक बांधिलकी साठी मोहम्मद अयाज आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार . संगीत जगतचे गुरुवर्य पंडीत हदयनाथ मंगेशकर यांनी साम गुरुकुल या रियालिटी सिंगीग शो मध्ये जेव्हा मोहम्मद अयाज महाराष्ट्राचा महागायक विजेता् ठरला तेव्हा सोलापूर सुरमणी ही उपाधी देऊन गौरविण्यात आले. त्याच पद्धतीने आज जिल्हा प्रशासनाने एक सामान्य कलावंतास ब्रंड अंम्बेसिटर ची उपाधी देऊन सन्मानित केले ही बाब माझ्या साठीच नाही तर माझ्या समस्त सोलापूर रसिकांसाठी सुध्दा अभिमानास्पद आहे. या वेळी मोहम्मद अयाज यांनी एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो हे सादर करुन आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुष्का शर्मा , ओरिसाचे राज्य समन्वयक अभिनव घोलप , जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खामितकर सह अनेक कर्मचारी उपस्थित होते. कलेक्टर मिलींद शंभरकर साहेब व दिलीप स्वामी साहेब , निवासी उपजिल्हाधिकारी शमाताई पवार , सुनिल खामीतकर व सर्व प्रशासनाचे मी सदैव ऋणी राहीन! प्रशासन जे काही माझ्या वर जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार अशी प्रतिक्रिया मोहम्मद अयाज यांनी दिली