पुणे-
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त पुणे महानगरपालिका इमारत येथील छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून स्मृती दिन कार्यक्रम आयोजित केला.यावेळी मान्यवर *पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब , नगरसचिव कार्यालय अधीक्षक सौ योगिता भोसले* तसेच शिवसेना पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांच्या हस्ते प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.यावेळी *अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले, महिला शहर अध्यक्ष श्रुतिका पाडळे , युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , सरचिटणीस गणेश मापारी,सचिन वडघुले, मिलन पवार,सुशील पवार ,अनिल बालवडकर,तानाजी शिरोळे, शिवराज कौलगे पाटील, योगेश टापरे* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुधीर कुरुमकर यांनी शाहू महाराचे सामाजिक विचार व कार्य या विषयी विचार मांडले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.मराठा महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत युवक सरचिटणीस सचिन वडघुले , सुत्रसंचालन महिला शहर अध्यक्ष श्रुतिका पाडळे यांनी केले, ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.