पुणे –माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने उपक्रम पुणे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या शिवदर्शन, सहकारनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये ‘ मनसोक्त आंबे खा पार्टी’ रंगली. विशेष म्हणजे यावेळी आंबे खा स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी आनंदही लुटला.
माजी उपमहापौर व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा इयत्ता सहावी ते दहावीच्या साडे तीनशे विद्यार्थी – विद्यार्थिनींनी लाभ घेतला. यावेळी अमित बागुल यांच्यासह पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मसलकर , ताठे,कदम आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा कसा सदुपयोग करायचा यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘ मनसोक्त आंबे खा पार्टी’ चा आनंद लुटला. यावेळी आंबे खा स्पर्धा घेण्यात आली त्यात इयत्ता सहावीतील विराज काळे( प्रथम), सई अनिल जगताप (द्वितीय) इयत्ता सातवीतील कुड्सिया शेख (प्रथम), चैतन्य पवार (द्वितीय)
इयत्ता आठवीतील अरमान सय्यद (प्रथम), लक्ष्मी कांबळे (द्वितीय),इयत्ता नववीतील पार्थ शेंडगे ( प्रथम),रोहित शिंदे ( द्वितीय),इयत्ता दहावीतील तनूजा शिंदे (प्रथम),साईं करपे (द्वितीय ) यांनी यश मिळवले. या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात आंबे प्रदान करण्यात आले. हास्यकल्लोळात विद्यार्थीवर्ग आंबे खा पार्टीमध्ये दंग झाली होती. या उपक्रमासाठी अमित बागुल मित्रपरिवाराने पाच हजार आंबे उपलब्ध करून दिले.