जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन
पुणे : सोनिया सूर्यवंशी, ईश्वरी रणदिवे, अदिती जाधव, साई सिद्धी, नरेंद्र टेकळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर सुरू आहे. भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, शिरीष मोहिते, ट्रस्टचे अध्यक्ष तेजस जाधव, कार्याध्यक्ष नीलेश खाणेकर, उपाध्यक्ष डॉ. अमरसिंह भोरे, खजिनदार शैलेश खाणेकर, चिटणीस प्रितम मळेकर, सरचिटणीस यश खाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील ३२ ते ३५ किलो वजनी गटाच्या मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत ईश्वरी रणदिवेने साक्षी मीनाचा ५-० ने पराभव केला, तर अदिती जाधवने जिया शेखला ५-० ने नमविले. मुलींच्या ३५ ते ३७ किलो वजनी गटात श्रेया धांधरने जान्हवी सांगळेला ५-० ने नमविले. सोनिया सूर्यवंशीच्या आक्रमक ठोश्यांसमोर जिनसा कुंभार निष्प्रभ ठरली.
मुलांच्या गटाच्या ३५ ते ३७ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत साई सिद्धीने सोहम जाधवचे आव्हान ३-२ ने परतवून लावले. नरेंद्र टेकळेने प्रभू चालवडीला, तर रणवीर कटारियाने ओंकार भालचिमला ५-० ने नमविले.
निकाल : उपांत्यपूर्व फेरी – मुली – ३७ ते ४० किलो – आर्या कोंडके वि. वि. स्वराली जाधव ५-०, आंचल कुमारी वि. वि. झिनत शेख नॉक आउट. ४० ते ४३ किलो – आर्या पागरे वि. वि. श्रावणी वाघमारे ३-२, प्रांजल आठवले वि. वि. चैतन्या शिंदे ५-०. ४३ ते ४६ किलो – कृष्णा पवार वि. वि. इशिका मंडल ५-०, सोरा ढगे वि. वि. सृष्टी दोडमिसे नॉक आउट, ४४ ते ४६ किलो – सृष्टी चौरिया वि. वि. जान्हवी घोडे ५-०. ४८ ते ५० किलो – सृष्टी जाधव वि. वि. रोस सय्यद ३-२. ५० ते ५२ किलो – अलिझा जोविस वि. वि. सिमरन चौगुले ५-०. ५४ ते ५७ किलो – प्रांजल इंगळे वि. वि. ऋतुजा रणदिवे ५-०.
मुले – ३७ ते ४० किलो – आर्यन सरतापे वि. वि. संकेत धारणे नॉक आउट, पृथ्वीराज लोखंडे वि. वि. वेदांत भिलारे ५-०, प्रज्ज्वल सितापुरे वि. वि. कल्पेश बिका ५-० . ४६ ते ४९ किलो – शफिक शेख वि. वि. साईराज चौधरी ३-२. ४४ ते ४६ किलो – साहिल लोट वि. वि. उदय घोरपडे ५-०, भवंतू सूर्यवंशी वि. वि. यशदानी शेख ५-०. ५४ ते ५७ किलो – तन्मय जानराव वि. वि. प्रज्ज्वल हुबळीकर ३-२, ओम पवार वि. वि. टोनी तेलगू ४-१. ६६ ते ७० किलो – शिवम इजगज वि. वि. सुहान शेख नॉकआउट. ४९ ते ५० किलो – अमय सरगडे वि. वि. हर्ष गावडे नॉक आउट. ५२ ते ५६ किलो – सार्थक पारधी पुढे चाल वि. शिवम मोरे. ६० ते ६३ किलो – आकाश जाधव पुढे चाल वि. सुमीत गायकवाड.