मंदिराचे २५० वे वर्ष ; फुलांची आकर्षक सजावट व धार्मिक कार्यक्रम
पुणे : सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात श्री नृसिंह जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नृसिंह याग संपन्न झाला. तर, सायंकाळी कीर्तनकार सदानंद बुवा ताम्हनकर यांचे नृसिंह जन्माचे कीर्तन झाले. मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली.
मंदिराचे यंदा २५० वे वर्ष आहे. उत्सवाच्या निमित्ताने मुख्य पूजा दिलीप जोशी, अभिजित जोशी, अद्वैत जोशी आणि शेखर नांदे यांनी केली. उत्सवाच्या निमित्ताने दररोज मंदिरात विशेष पूजा होत होती आणि भजन, याग, कीर्तन, संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ५६ भोग प्रसाद नैवैद्य दाखवण्यात आला होता.