कोरोनावर नियंत्रणासाठी अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रिटमेंटवर भर द्या

Date:

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची सूचना

पुणे-कोरोनावर नियंत्रणासाठी अर्ली डिटेक्शन म्हणजे रुग्णांचा शोध आणि अर्ली ट्रिटमेंट म्हणजे तातडीने उपचार यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. पुणे शहर भाजपाने कोरोनाविषयक उपाययोजनांची सर्वंकष माहिती देणाऱ्या डॅशबोर्डच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, आ. माधुरीताई मिसाळ, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे आदींसह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, सध्या सगळीकडे रेमडिसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा असून हा विषय सद्यघडीला आपल्या हातात नाही आहे. पण त्याबरोबरच अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रिटमेंटवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठीच आगामी काही दिवसांत एक फिरती लॅब आपण शहरात उपलब्ध करून देणार आहोत. ज्याद्वारे शहराच्या प्रत्येक भागात जाऊन ही लॅब कोरोना चाचण्या घेऊन, त्यांचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. ज्यालाच अर्ली डिटेक्शन म्हणता येईल. यामुळे रुग्णांचा किंवा कोरोनाबाधितांचा शोध लवकर लागेल. तसेच त्याला उपचार ही लवकर मिळतील.

पुणे शहर भाजपाच्या कोविड संदर्भातील उपक्रमावर बोलताना श्री‌. पाटील म्हणाले की, सद्यघडीला प्रत्येकालाच मानसिक आधाराची गरज आहे. त्यावर सकारात्मक बातम्यांची आणि माहितीची आज सर्वांना गरज आहे. त्यासाठी पुणे शहर भाजपाने तयार केलेल्या डॅशबोर्डमुळे पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरण केंद्रे, ऑक्सिजन बेड आणि रेमडिसीवीरची उपलब्धता आदी माहिती समाविष्ट आहे. याचा पुणेकरांना आपल्या खबरदारीसाठी नक्कीच लाभ होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...