पुणे-जमेतुल कुरेश पुणे शहरच्यावतीने कुरेशी समाजाचा राज्यस्तरीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प भागातील सेंटर स्ट्रीटवरील कुरेशी नगरमध्ये हा १६ वा सामुदायिक विवाह सोहळा झाला . मौलाना हाफिज गुलाम अहमद , हाफिज मुबरशीर कुरेशी , हाफिज इद्रिस , हाफिज इत्तेशाह , मौलाना नियाज अहमद आदींनी हा सामुदायिक विवाह सोहळा लावला .
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक विनोद मथुरावाला , माजी आमदार मिलिंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन ऑल इंडिया जमेतुल कुरेशी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक इसाक कुरेशी , पुणे शहराध्यक्ष अनिस अहमद कुरेशी , पुणे कॅम्प अध्यक्ष अबरार कुरेशी , एजाज कुरेशी , ऍड . शकील कुरेशी , खजिनदार अरिफ बशीर कुरेशी , सरफराज कुरेशी , मोहम्मदअली अब्बास कुरेशी , मोहम्मदसाहब मुश्ताक कुरेशी , अजीम गुडाकूवाला , हसन अब्बास कुरेशी , अबू अब्बास कुरेशी , रफिक अब्बास कुरेशी , हाजी युसूफ कुरेशी आदींनी केले होते .