पुणे-जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक आयोजित युवाचार्य महेंद्रऋषीजी व उपाध्यय प्रवर.प्रविणऋषीजी . यांच्या जन्मदिवसानिमित्त ६० विविध सामाजिक संस्थांना १८०० ० किलो मोफत धान्य वाटप सौ. प्रमिला नौपतलाल सांकला चॅरिटेबल ट्रॅस्टच्या अध्यक्षा समाजभूषण प्रमिलाबाई नौपतलाल सांकला यांच्याहस्ते करण्यात आले . महर्षीनगरमधील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात हे मोफत धान्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी आगमवेता साध्वी श्री वैभवश्रीजी. यांनी आशीर्वचन दिले . व सामाजिक करणाऱ्या संस्थांबद्दल गौरवद्गार काढले . अशा सामाजिक सेवा करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा करीत आहे . समाजाने देखील यात पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला पाहिजे . असे आगमवेता साध्वी श्री वैभवश्रीजी यांनी सांगितले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण विजयकांत कोठारी , बी. जे. भंडारी ट्रस्टच्या ट्रस्टी सुश्राविका विमलबाई बंडूलालजी भंडारी , सुश्राविका संगिताबाई प्रमोदजी छाजेड , महावीर फूड बँकेचे संस्थापक प्रा. अशोक पगारिया , पुणे शाखा अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा , जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा , कार्याध्यक्ष विजय पारेख , खजिनदार संजय कटारिया , सेक्रेटरी प्रमोद छाजेड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
यामध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील सामाजिक ,कर्ण बधीर , अंध , अपंग , वृध्दाश्रम , कर्करोग काम करणाऱ्या अशा ६० सामाजिक संस्था मोफत धान्य वाटप करण्यात आले . यामध्ये १०० किलो गहू , १०० किलो तांदूळ , ४० किलो पोहे , १० किलो रवा ,२० किलो साखर , चहा ५ किलो , १० किलो तूरडाळ, ५ किलो मुगडाळ , ५ किलो तेल , ५ किलो गूळ आदी वाटप करण्यात आले .
समाजात अनेक सामाजिक संस्था काम करतात परंतु या सामाजिक संस्थांमधील मुलांची भूक भागविण्याचे काम जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक हे मोफत धान्य वाटप करीत असतात वर्षातून दोनदा हे धान्य वाटप केले जाते . यासाठी जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँकचे सर्व सदस्य मनापासून या सामाजिक उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतात . गेली १५ वर्षापासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो . अशी माहिती महावीर फूड बँकेचे पुणे शाखा अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी दिली .