Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे खाजगीकरण करू नये

Date:

वाडिया कॉलेज विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळाची

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील उपायुक्त नवनाथ जगताप यांच्याकडे मागणी

पुणे-मॉडर्न एजुकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे खाजगीकरण करू नये , तसेच हि संस्था धनदांडग्यांच्या घशात घालू नये अशी मागणी वाडिया कॉलेज विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील उपायुक्त नवनाथ जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

ढोलेपाटील रोडवरील  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात हे निवेदन देण्यात आले .  वाडिया कॉलेज विद्यार्थी कृती समिती पदाधिकारी राहुल तायडे , प्रकाश साळवे , सुरेश खुरपे , प्रशांत वर्मा , श्रीनिवास दिसले , केशव शिंदे , अनिल शेवरे , नितीन पत्की , महिपाल वाघमारे , नितीन रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते . गेल्या अनेक वर्षांपासून घटनेतील तरतुदीनुसार या संस्थेचा कारभार सुरु असताना काही धनदांडग्या मंडळींनी मॉडर्न एजुकेशन सोसायटीची घटना अधिकृत नाही असे म्हटले  आहे . हे हास्यास्पद आहे . लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेऊन उच्चं पदावर काम करीत आहे . जर घटना अधिकृत  नसेल तर या संस्थेतून शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी अनधिकृत मानायचे का ? असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला . तसेच घटना गहाळ झाली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे म्हणणे संशयला वाव देणारे आहे याची जाणीव शिष्टमंडळाने करून दिली . काही धनदांडग्यांनी  हि संस्था ताब्यात घ्यायचा कट रचला आहे . त्यामुळे धनदांडग्यांचे म्हणणे न ऐकता विद्यार्थी हिताचा विचार करून मॉडर्न एजुकेशन सोसायटीने  सादर केलेल्या घटनेला आपण ताबडतोब मान्यता दयावी व त्याप्रमाणे कारभार करण्याचा आदेश आपण संस्थेला द्यावा अशी विनंती शिष्टमंडळाने केली .

जर  मागण्या मान्य न झाल्यास शिक्षण प्रेमी पुणेकरांना बरोबर घेऊन आंदोलन करावे लागेल . असा इशारा शिष्टमंडळाने दिला .

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील उपायुक्त नवनाथ जगताप यांनी मॉडर्न एजुकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे खाजगीकरण होऊ देणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...