पुणे-श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६६८ व्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर विभागाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी श्री संत शिरोमणी महाराज प्रतिमेचे पूजन व पादुकांची पूजा विनोद रमाकांत खोले व संगीता खोले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर आरती श्री नामदेव शिंपी समाज , पुणे लष्कर विभाग अध्यक्ष प्रदीप खोले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी सुबोध भावकर , किशोर निखळ , संजय फटके , ऍड. मोहन भावकर , सुभाष काळे , मुरारी हिरवे , श्रीकांत काळे , राजन पोटे , निरेन हिरवे , सिध्दार्थ भावकर , संजय लचके , सुजय खोले , मनोज शिंदेकर , सुधीर ढवळे , अरुण भांबुरे आदी मान्यवर व शिंपी समाज बांधव उपस्थित होते .
या समाधी सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले , पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे उपाध्यक्ष नंदू बिडकर , संचालक पोपट गायकवाड , नगरसेविका स्मिता वस्ते , नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेचे कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय नेवासकर , पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके , सुभाष पांढरकामे आदी मान्यवर उपस्थित होते .