पुणे-मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुणे लष्कर भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता . लष्कर भागातील गजबजलेला महात्मा गांधी रोडवरील सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती . लष्कर भागातील प्रसिध्द असलेली इराणी हॉटेल्देखील बंद मध्ये सहभागी झाली होती . महात्मा गांधी रोड , ईस्ट स्ट्रीट , साचापीर स्ट्रीट , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , रावसाहेब केदारी रस्ता , सेंटर स्ट्रीट , जान मोहम्मद स्ट्रीट , ताबूत स्ट्रीट , बुटी स्ट्रीटवरील सर्व बाजारपेठ व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवली होती .
लाल देवळाच्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर प्रवासी वाहतूक करणारी चार चाकी वाहनाची काचा दुपारच्या सुमारास फोडण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी मार्केट व कुंभारबावडी बंद ठेवण्यात आली होती . अनुचित प्रकार घडू नये पोलीस बंदोबस्त चौकाचौकांमध्ये ठेवण्यात आला होता .
यावेळी सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट भागातील कार्यकर्ते अंनत गव्हाणे ,निलेश कणसे , राजेंद्र म्हस्केपाटील ,जितेंद्र म्हस्के , विनायक काटकर , माधव काटकर , विजय महाडिक , अनिल निंबाळकर , विशाल मोरे , सुमित गावडे, अरविंद निंबाळकर , राहुल गव्हाणे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते .
बजमे रेहबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम अमीर शेख यांनी बंदला पाठिंबा दिला . यावेळी बजमे रेहबर कमिटीचे उपाध्यक्ष फैय्याज खान , सचिव इरफान मुल्ला , खजिनदार ऍड. अमित चव्हाण , फैय्याज शेख आदींनी बंदला पाठिंबा दिला .