‘विश्वशांतीचा पुरस्कार करण्यासाठी आंतरपंथीय आणि आंतरधर्मीय सलोख्याची गरज’ या विषयावर कायदे पंडित अॅड. जफरयब जिलानी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन
पुणे : डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘विश्वशांतीचा पुरस्कार करण्यासाठी आंतरपंथीय आणि आंतरधर्मीय सलोख्याची गरज’ या विषयावर श्रीराम जन्म भूमी-बाबरी मस्जिद विवादस्पद जागेसंबंधी प्रतिवादी व लखनौ येथील सुप्रसिद्ध कायदे पंडित आणि इस्लामचे गाढे अभ्यासक अॅड. जफरयब जिलानी यांचे विशेष व्याख्यान शनिवार, १७ जून २०१७ रोजी दुपारी २.१५ वाजता माईर्स एमआयटीच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे असतील. तर नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध विद्वान, उर्दू लेखक आणि पत्रकार फिरोज बख्त अहमद (मौलाना आझाद यांचे नातू) हे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे या व्याख्यानाला विशेष महत्व आहे.
कायदा व न्याय क्षेत्रातील व्यक्तींंनी व समाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व विचारवंतांनी या विशेष व्याख्यानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी केले आहे.