Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…!

Date:

पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य, समर्पित भावनेने करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या ज्येष्ठ साहित्यिका व लेखिका डॉ. माधवी वैद्य (पुणे), थोर समाजसेविका व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स (द नेदरलँडस्), नामवंत शिक्षणतज्ञ व अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉ. मेहेर मास्टर मूस (मुंबई), थोर समाजसेविका व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे (लातूर) व ज्येष्ठ समाजसेविका व भारूडकार सौ. चंदाताई जगदीश तिवाडी (पंढरपूर, जि.सोलापूर) या पंचकन्यांना “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार”जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवार, दि. २३ मे २०१७ रोजी, सकाळी  १०.३० वा. रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.
या पंचकन्यांबरोबरच पाथर्डी, अहमदनगर येथील थोर समाजसेविका श्रीमती कौसल्याताई कोंडीबा ढाकणे यांना ‘‘ विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. ११,०००/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड  या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.
पुरस्कारार्थींचा अल्पसा परिचय खालीलप्रमाणे-
 डॉ. माधवी वैद्य, जेष्ठ साहित्यिक, लेखिका व समीक्षक आणि माजी अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. साहित्य परिषदेच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये त्या पहिल्या महिलाध्यक्षा ठरल्या आहेत. त्यांनी मराठीतील १३ नामवंत कवीच्या कवितांवर दूरदर्शनसाठी मालिकेचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या फुलांच्या रसाचा/अंशाचा वापर करून अनेक प्रकारचे आजार कमी करता येतात यासाठी पुष्पौषधी या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे.
 प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स, संचालिका, बायोलॉजी अँड सोसायटी, अ‍ॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटी, द नेदरलँडस् – प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स या सोसायटी फॅकल्टी ऑफ अर्थ अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेस, अ‍ॅथेना इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन इन्व्होवेशन, कम्युनिकेशन इन हेल्थ अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेस अशा क्षेत्रात  कार्यरत आहेत. आंतरशाखीय संशोधनावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या संशोधनाचा विविध स्वयंसेवी संस्थांना व समाजाला उपयोग होत आहे.
डॉ. मेहेर मास्टर मूस, अध्यक्ष, झोरास्ट्रियन कॉलेज, मुंबई – मुंबई येथील झोरास्ट्रियन कॉलेजच्या त्या अध्यक्षा आहेत.  त्या २००४ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष सल्लागार पदी आहेत. आंतरधर्मीय संवाद व शांततेसाठी त्या कार्यरत आहेत. सर्व धर्मांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.
डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे, थोर समाजसेविका, लातूर – डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे या स्त्रीभ्रूणहत्या व लिंग समभाव जाणीव जागृती, व्यक्तिमत्व विकसन, सरोगसी, तृतीयपंथीय व समलिंग समस्यांबरोबरच कॅन्सरग्रस्त महिलांसाठी संवेदना या मंचाच्या माध्यमातून लोकजागृती करीत आहेत. लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
सौ. चंदाताई जगदीश तिवाडी, ज्येष्ठ समाजसेविका व भारुडकार, पंढरपूर, जि.सोलापूर -१९८२ पासून सौ. चंदाताई तिवाडी भारुडाच्या माध्यामातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. सोबतच आपल्या प्रभावी शैलीतून त्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर सामाजिक, आध्यात्मिक व राष्ट्रीय कार्य करीत आहेत.
अहमदनगर येथील थोर समाजसेविका श्रीमती कौसल्याताई कोंडीबा ढाकणे यांनी पतीचे अकाली निधन झाले असतानाही, अतिशय व्रतस्थपणे जीवन जगून आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांची दोन्ही मुले आज उच्च पदावर कार्यरत आहेत.    .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...