पुण्याचे उपमहापौर माझे जवळचे मित्र नवनाथ कांबळे यांचे आज सकाळी हृदय विकाराने निधन झाले. तळागाळातील जनसामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पुण्याचे उपमहापौर झाल्यानंतर ही त्यांचा कामाचा धडाका कायम होता. सतत कोणत्यातरी विकास कामांसाठी ते माझ्याशी संपर्कात असायचे. दोन दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृहात एका बैठकीदरम्यान त्यांची माझी भेट झाली होती. त्यांचे अकस्मात निघून जाणे मनाला चटका लावणारे आहे. नवनाथ कांबळेंच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला
नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला असून त्यांचा नागरिकांमध्ये चांगला जनसंपर्क होता.
सच्चा मित्र गमावला
राजकारणात येण्यापूर्वीपासून त्यांची माझी ओळख होती. सर्वसामान्य कुटुंबातून नवनाथ कांबळे हे राजकारणात आले होते. त्यांनी जीवनात कायम संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा मित्रा गमवला.
दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री
खा.वंदना चव्हाण ‘पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने धक्का बसला. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दलित पँथरच्या लढ्याच्या काळातील सक्रिय कार्यकर्ता हरपला आहे, उपमहापौर पदावर कार्यरत झाल्यावर अल्पावधीत आकस्मित निधन होणे, हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आहे, अशा शब्दात खा.वंदना चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ही त्यांनी म्हटले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विन्रम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.