मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर वळवण पुलावर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास खासगी बस उलटली. या अपघातात १८ जण जखमी झाले आहेत. त्यात पाच मुलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना निगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त खासगी बस मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होती. वळवण पुलावर बस उलटली. या अपघातात बसमधील १८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील पाच मुलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना निगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर पाच जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बस दुर्घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.