पुणे-एमआयएम पक्षाचे सुमारे २२ उमेदवार रिंगणात उतरले असून ..मनसेची बरोबरी करीत ते प्रचारात सक्रीय झाले असताना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, तसेच विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त पाठक यांनी मंजुरी दिली आहे. ही सभा उद्या मंगळवारी सायंकाळी 5.00 वाजता भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन लगत टिंबर मार्केट येथे होणार आहे.
ओवैसी यांच्या भवानी पेठ येथील सभेला अरुंद रस्ता आणि प्रक्षोभक भाषण या कारणास्तव स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीती हा परिसर मिश्र वस्तीचा असून संवेदनशील भाग आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पक्षाचे प्रचार रॅली, व सभा सुरू आहेत. ओवैसी यांची भाषणे प्रक्षोभक व जातीवाचक असल्याने त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे ते स्थान सभेस अनुकूल नाही. परिणामी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारत असल्याचे स्पष्ट केले होते.
याचा पक्षाने तीव्र निषेध करता सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याची भूमिका पक्षाने घेतली होती. त्यानुसार पक्षाच्या कोअर कमिटी सदस्य अंजुम इनामदार व जुबेर शेख यांनी भेट घेऊन पक्षाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त हिरेमठ व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त पाठक यांनी टिंबर मार्केट येथील सभेला परवानगी दिली.
पुणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार जुबेर बाबु शेख हे आहे.