पुणे- राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष मिळून खाऊ,भाऊ भाऊ असे असून अजितदादा आणि खा.अनिल शिरोळे यांच्यामुळे मेट्रो ला पुण्यात यायला उशीर झाल्याची टीका महापालिकेतील कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांनी केली यावेळी केवळ भाजपकडून मान सन्मान मिळविण्यासाठी महापौरांनी लाचारी करणे ठाम न राहणे म्हणजे कठीण च असे सांगत त्यांनी महापौर प्रशांत जगताप यांचा निषेध केला तर अनिल शिरोळे यांच्यावर गंभीर आरोप ही केले …
आज पुणे शहर कॉंग्रेस ने आयोजित केलेल्या मेट्रो च्या प्रतीकात्मक भूमिपूजनाचा कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते करून भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. रमेश बागवे,विश्वजित कदम, अभय छाजेड,दीप्ती चौधरी,अविनाश बागवे, आबा बागुल,सतीश देसाई ,उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर , कमल व्यवहारे,सुधीर जानज्योत ,काका धर्मावत ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती .
पहा आणि ऐका नेमके अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ….