- डेक्कन जिमखानाच्या अथर्व वणवे, आर्यन्स क्रिकेट अकादमीच्या तेजस तोलसणकर यांची शतकी खेळी
पुणे, दि.24 नोव्हेंबर 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत संकेत पांडे(64धावा व 3-37) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब संघाने आर्यन्स क्रिकेट अकादमी संघावर पहिल्या डावाच्या 3धावांच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात अथर्व वणवे याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या 91 धावांच्या अधिक्याच्या जोरावर नॉर्थ झोन संघावर विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत तिसऱ्या दिवशी आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाच्या 31.1षटकात 5बाद 134धावापासून खेळास आज सुरुवात झाली. तत्पूर्वी काल पहिल्या डावात मेट्रो क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50.5षटकात सर्वबाद 230धावा केल्या. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 51.2 षटकात 227 धावावर संपुष्टात आला. यामध्ये तेजस तोलसणकरने एकाबाजूने लढताना 129चेंडूत 16चौकार व 1षटकाराच्या मदतीने 101धावांची शतकी खेळी केली. तेजसला हार्दिक कुरंगळेने 15 धावा काढून साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 71 चेंडूत 54 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मेट्रो क्रिकेट क्लबच्या गुरवीर सिंग सैनी(3-23), संकीत पांडे(3-37) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 3धावांची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या मेट्रो क्रिकेट क्लब संघाने 53 षटकात 5बाद 206धावा केल्या. यात संकीत पांडे 64, वरद खाणीवाले 54, निशांत नगरकर नाबाद 37, प्रशम नाबाद 21यांनी धावा केल्या. त्यामुळे या अनिर्णित सामन्यात मेट्रो क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर आर्यन्सविरुद्ध विजय मिळवला. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा संकीत पांडे सामनावीर ठरला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील सामन्यात तिसऱ्या दिवशी नॉर्थ झोन संघाच्या आज 38षटकात 1बाद 102धावापासून पुढे खेळ सुरु झाला. प्रथम फलंदाजी करताना 72 षटकात 9बाद 254धावा केल्या. यात मुकेश जट 57, प्रसन्ना निळे 51, तेजस पवार 49, अनिकेत इंद्रजीत नाबाद 21, कृष्णा अगरवाल 17, तन्मय शिरोडे 16, पवन सानप 13 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखानाकडून हितेन बनसोडे(4-95), आयुश काब्रा(3-65), यश बोरामणी 1-27) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 70षटकात 8बाद 345धावा केल्या. यात अथर्व वणवेने संयमी खेळी करत 134चेंडूत 11चौकारांच्या मदतीने 109धावांची खेळी केली. अथर्व व यश बोरामणी(68धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 78चेंडूत 88धावांची भागीदारी केली. त्यानंतर अथर्वने प्रकाश चौधरी(नाबाद 69धावा)च्या साथीत 118चेंडूत 89 धावांची भागीदारी करून संघाला 91 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. नॉर्थ झोनकडून तन्मय शिरोडेने 86धावात 4गडी तर, तेजस पवारने 81धावात 3 गडी बाद केले. त्यामुळे या अनिर्णित सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर नॉर्थ झोनविरुद्ध विजय मिळवला. अथर्व वणवे सामनावीर ठरला.
वीरांगना मैदानावरील सामन्यात पहिल्या दिवशी केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने 90षटकात 7बाद 335धावा केल्या. यात वरद मोदक नाबाद 45धावा, रिषी अग्रहार नाबाद 0धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून दोन दिवसाचा खेळ शिल्लक आहे. निकाल: पीवायसी मैदान: पहिला डाव: मेट्रो क्रिकेट क्लब: 50.5षटकात सर्वबाद 230 धावा वि.आर्यन्स क्रिकेट अकादमी: 51.2 षटकात सर्वबाद 227 धावा(तेजस तोलसणकर 101(129,16×4,1×6), प्रमोद नारळे 24, अमन मुल्ला 18, हार्दिक कुरंगळे 15, तनय सांघवी 14, गुरवीर सिंग सैनी 3-23, संकीत पांडे 3-37, रेहान खान 2-54, नरेंद्र पाटील 1-29, स्वराज वाबळे 1-34); मेट्रो क्रिकेट क्लब संघाकडे पहिल्या डावात 3धावांची आघाडी;दुसरा डाव: मेट्रो क्रिकेट क्लब:53 षटकात 5बाद 206धावा(संकीत पांडे 64(51,11×4,2×6), वरद खाणीवाले 54(83,10×4), निशांत नगरकर नाबाद 37(68,3×4,3×6), प्रशम नाबाद 21, निलय नेवसकर 2-27) वि. आर्यन्स क्रिकेट अकादमी; सामना अनिर्णित; सामनावीर-संकीत पांडे; मेट्रो क्रिकेट क्लब पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी;
डेक्कन जिमखाना मैदान: पहिला डाव: नॉर्थ झोन: 72 षटकात 9बाद 254धावा(मुकेश जट 57(149,7×4), प्रसन्ना निळे 51(112,8×4), तेजस पवार 49(54,7×4,1×6), अनिकेत इंद्रजीत नाबाद 21, कृष्णा अगरवाल 17, तन्मय शिरोडे 16, पवन सानप 13, हितेन बनसोडे 4-95, आयुश काब्रा 3-65, यश बोरामणी 1-27) वि.डेक्कन जिमखाना: 70षटकात 8बाद 345धावा(अथर्व वणवे 109(134,11×4), यश बोरामणी 68(66,8×4,1×6), अभिषेक ताटे 36(33,7×4), अनिष 33, प्रकाश चौधरी नाबाद 69(91,7×4,1×6), ओंकार साळुंखे नाबाद 17, तन्मय शिरोडे 4-86, तेजस पवार 3-81, लवकेश देशमुख 1-45); सामना अनिर्णित; सामनावीर-अथर्व वणवे; डेक्कन जिमखाना संघ पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी;
वीरांगणा मैदान: पहिला डाव: केदार जाधव क्रिकेट अकादमी: 90षटकात 7बाद 335धावा(अभिमन्यू जाधव 92(110,16×4), दिग्विजय जाधव 85(136,13×4), अक्षय झोरे 54(75,4×4), वरद मोदक नाबाद 45(103,4×4), रिषी अग्रहार नाबाद 0, अक्षय चव्हाण 24, यश दुबे 4-88, सौरभ डांगे 2-30) वि.विजय क्रिकेट क्लब: .