ई -मुव्ही’ निर्मिती स्पर्धेत 174 विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलीटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै -आय सी टी अकॅडमी च्या वतीने आयोजित ‘ई -मुव्ही निर्मिती’ वार्षिक स्पर्धेत 174 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संगणकावर आधारित ही स्पर्धा बुधवारी झाली.
विजेत्यांना एम सी ई सोसायटी च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार आणि सुलताना मुलाणी (शिक्षण मंडळातील अधिकारी, पुणे महानगरपालिका) यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थी श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक तसेच पहिल्या तीन विजेत्या प्रशिक्षकांना टॅबलेट देण्यात आले. यावेळी मुमताज सय्यद (अॅकॅडमीच्या संचालक), ऋषी आचार्य (पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य) उपस्थित होते.
चौथी ते सहावी, सातवी ते नववी या गटात आणि 90 संगणक प्रशिक्षकांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. शकील इंजिनियर, हर्शल साठे, सुरज पाटेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. विद्यार्थी श्रेणी चौथी ते सहावीमध्ये झाराफशा शेख (इयत्ता चौथी, शामसुद्दीन इनामदार उर्दू प्रायमरी स्कूल), विद्यार्थी श्रेणी सातवी ते नववी या गटात साफी मुस्ताकीम अन्सारी (इयत्ता आठवी, बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा नं 74- बी) तर संगणक प्रशिक्षक गटामध्ये असिफा खान (लेडी तहेरून्नीसा उर्दू प्रायमरी स्कूल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला