पुणे- (अभिषेक लोणकर )
दिग्दर्शक गटातून महेश मांजरेकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज अजूनही एक गूढ असे वलय बनून आहे . मांजरेकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर . माघारीच्या अंतिम दिवशी काही तास अगोदर त्यांचा सूचक माघारीसाठी अर्ज घेवून आला होता पण त्यावर मांजरेकर यांचीच सही नव्हती . ते परदेशी असल्याने सही होवू शकली नाही असे सांगत हा अर्ज आला होता जो निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. मांजरेकर यांच्या बाबतीत घडलेले हे सारे मोठ्ठे अचंबित करणारे आहे.माघार घ्यायची होती तर अर्ज का भरला ? आणि माघारीच्या अर्जावर सही करून का परदेशी गेला नाहीत ? निवडणुकीबाबत ची प्रोसिजर त्यांना ठावूक नसावी काय ? अशा अनेक गोष्टी आहेत . त्यामुळे अखेर आता मतपत्रिकेत मांजरेकर यांचे नाव राहणार आहे आणि त्यांना मतेही पडणार आहेत . अर्थात अजून त्यांनी प्रचार सुरु केला नाही. करतील अशी शक्यता दिसत नाही .
दिग्दर्शक गटातून १२ उमेदवार रिंगणात आहेत ज्यामध्ये गजेंद्र आहिरे आहेत . सतीश रणदिवे हे पूर्वीचे संचालक आहेत ९ पॅनल चे ९ आणि ३ अपक्ष अशी हि लढत मोठी विचित्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
वितरक विभागातून जणू प्रसाद सुर्वे यांना संधी मिळावी असेच उमेदवार अन्य पॅनल नि दिल्याचा आरोप मध्यंतरी एका जुन्या नेत्याने केला होता तरीही त्यांची लढत लक्ष्यवेधी असेल भंडारे आणि नलावडे यांना होणारे मतदान सुर्वे येतील कि पडतील हे निश्चित करतील असा दावा करण्यात येतो आहे .
अशी असेल लढत …..
वितरक विभाग
१)संजीव भंडारे-कपबशी
२)प्रसाद सुर्वे -रिक्षा
३)प्रकाश जाधव –समई
४)मधुकर देशपांडे-पतंग
5)बळीराम गावड- विमान
6)सुभाष नलावडे -उगवता सूर्य
———————————-
दिग्दर्शक
१)गजेंद्र आहिरे -कपबशी
२)शिरीष राणे -रिक्षा
३)विजय राणे -समई
४)सतीश रणदिवे पतंग
5)मोहन परब-विमान
6)ज्ञानेश्वर आंगणे -मशाल
७)अशोक सूर्यवंशी-छत्री
८)विजय सावंत- उगवता सूर्य
९)परशुराम गवळी -सायकल
१०)सुर्यकांत तिवडे- दोन पाने
११)रामदास परसैया-कपाट
१२)महेश मांजरेकर – नारळाचे झाड
————————————
विजय पाटकर हे 5 वर्षे संचालक होते आणि एक वर्षाहून अधिक काळ ते महामंडळाचे अध्यक्ष होते . आता ते अभिनेता विभागातून पुन्ह निवडणूक लढत आहेत . मुळात ज्या जे के पाटील यांच्या पॅनल मधून ते गेल्यावेळी निवडून आले त्यांची त्यांनी जाण ठेवली नाही . नंतर ज्या आपल्या गटातील 11संचालकांना घेवून कारभार केला .त्या ११ जणांच्या समुहाचे आता ३ तुकडे पडले आहेत . पाटकर यांच्या सानिध्यात जो जो आला त्यात्या प्रत्येकाने पाटकर यांच्या विश्वासाहर्तेबाबत शंका उपस्थित करीत गेला . अशात त्यांना कोल्हापूर मधील आनद काळे यांच्याशी सामना करता करता कोंडके गटाचे मुंबईती अभिनेते मिलिंद गवळी आणि भोसले गटाचे सुशांत शेलार यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे . या विभागात एकूण १२ उमेदवार असल्याने तसा या विभागातील सामना रंगणार आहे . पुण्याचा कोणीही अभिनेता यात नसल्याने मुंबई -कोल्हापूर अशी विभागणी हि झाली असल्याने , पाटकर हे शेवटच्या वर्षात अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत वादग्रस्त ठरल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे
अभिनेता
१)मिलिंद गवळी -कपबशी
२)आनंद काळे -रिक्षा
३)विजय पाटकर- समई
४)सुशांत शेलार -पतंग
5)मोहन पिंपळे -विमान
6)भालचंद्र मोरे -मशाल
७)आनंद खाडे -छत्री
८)उदय मराठे -उगवता सूर्य
९)रणजीत मिणचेकर-सायकल
१०)सुभाष गुंदेषा -लंबकाचे घड्याळ
११)कृष्णाजी राजे -घडा
१२)श्रीपती वगरे -ग्यास सिलेंडर
—————————–
संगीत नृत्य विभाग
१)नंदू होनप -कपबशी
२)अनिल सुतार -रिक्षा
३) संतोष भांगरे -समई
४)निकिता मोघे -पतंग
5)कोमल देसाई- विमान
6) संतोष आंब्रे -मशाल
७)संदीप उर्फ दिगंबर डांगे -उगवता सूर्य
लेखक विभाग
१)संजय पवार -कपबशी
२)प्रकाश राणे -रिक्षा
३)राजेश देशपांडे-समई
४)पितांबर काळे -पतंग
5)अनिल पवार-विमान
6)राजेश मयेकर-मशाल
७)राजेंद्र बापुर्देकर-छत्री
८)सावता गवळी -उगवता सूर्य