महिंद्राने दाखल केली नवी ट्रिओ झॉर इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो

Date:

बेंगळुरू-: महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. या 19.4 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने भारतात ट्रिओ झॉर हे नवे इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो मॉडेल दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे.  या मॉडेलची किंमत 2.73 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली, नेट ऑफ FAME 2 व स्टेट सबसिडीज) आहे. ट्रिओ झॉर ही प्रसिद्ध ट्रिओ सुविधेवर आधारित आहे आणि त्यामध्ये 3 प्रकार उपलब्ध आहेत – पिकअप, डेलिव्हरी व्हॅन व फ्लॅट बेड. ही वाहने भारतातील निवडक शहरांमध्ये महिंद्रा स्मॉल कमर्शिअल डीलरशिपमध्ये डिसेंबर 2020 पासून उपलब्ध होतील.

ट्रिओ झॉर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. देखभालीसाठी प्रति किमी केवळ 40 पैसे* इतका कमी खर्च येत असल्याने सध्याच्या डिझेल कार्गो 3-व्हीलर्सच्या तुलनेत हे वाहन दरवर्षी 60,000+ रुपये बचत करते*. हे वाहन 8kW इतकी या उद्योगातील सर्वोत्तम** पॉवर आणि 42 Nm टॉर्क इतके श्रेणीतील सर्वोत्तम*** टॉर्क देते. 550 किलो पेलोड हेही ट्रिओ झॉरचे श्रेणीतील सर्वोत्तम*** वैशिष्ट्य आहे.

वाहन दाखल केल्याबाबत, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोएंका म्हणाले, “महिंद्राच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही स्वच्छ, हरित व तंत्रज्ञानाने जोडलेल्या भविष्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित आहोत. सर्वत्र कनेक्टिविटी देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करण्यामध्ये जगभरात आघाडी घेण्यासाठी भारताकडे मोठी क्षमता आहे, असे मला वाटते. ट्रिओ सुविधेतून, नवे तंत्रज्ञान व मेक इन इंडिया याद्वारे आमची आत्मनिर्भर भारतसाठीची बांधिलकी दिसून येते. सर्वदूर डिलेव्हरी देण्यासाठी ट्रिओ झॉर स्वच्छ, शाश्वत व किफायतशीर सेवा देणार आहे.“

या निमित्ताने, महिंद्रा इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, “ट्रिओ या प्रसिद्ध 3-व्हीलर सुविधेने भारतीय रस्त्यांवर 35 दशलक्ष किमीहून अधिक प्रवास करणारे 5,000+ समाधानी ग्राहक मिळवून अगोदरच सर्वदूर वाहतूक सुविधा दिली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिओ झॉर विकसित केली आहे आणि ती ग्राहकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ट्रिओ झॉर दरवर्षी 60,000+ रुपयांपर्यंत ग्राहकांना बचत करण्याची सुविधा देणार आहे, तसेच यामुळे ग्राहकांना त्यांच्या अपेक्षा व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे आणि सर्वदूर डिलेव्हरी देणे शक्य करणार आहे.”

ट्रिओ झॉरची ठळक वैशिष्ट्ये:

1.       दरवर्षी 60,000 रुपयांहून अधिक इतकी सर्वाधिक बचत (वि. डिझेल कार्गो):

·         डिझेल कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत इंधनाच्या खर्चामध्ये प्रति किमी 2.10 रुपये बचत

·         देखभालीसाठी प्रति किमी केवळ 40 पैसे*, या तुलनेत डिझेल 3 व्हीलरसाठी 65 पैसे, इतका कमी खर्च येत असल्यानेअधिक बचत

2.       आकर्षक कामगिरी:

·         8kW ही उद्योगातील सर्वोत्तम* पॉवर आणि 42Nm इतके श्रेणीतील सर्वोत्तम** टॉर्क

·         बूस्ट मोडउच्च वेगासह वाहन चालवण्याचा उत्तम अनुभव घ्या आणि झटपट टर्नअराउंड टाइम नोंदवा

·         आधुनिक IP67-रेटेड मोटरमुळे धूळ व पाणी शिरण्यापासून संरक्षण

·         550 kgs हा श्रेणीतील सर्वोत्तम** पेलोड – इलेक्ट्रिक 3 व्हीलर्समध्ये श्रेणीतील सर्वात उंच पेलोडमुळे उत्पन्न मिळवण्याच्या अधिक संधी

·         125 km या सर्टिफाइड ड्रायव्हिंग रेंजमुळे दररोज अधिक ट्रिप करा

3.       आधीपेक्षा सुरक्षित व स्थिर:

·         डिझेल व इलेक्ट्रिक कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत, 2216 mm इतका या उद्योगातील सर्वात लांब व्हीलबेस असल्याने सुरक्षित व स्थिर राइड

·         डिझेल व इलेक्ट्रिक कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत 30.48 cm इतक्याया उद्योगातील सर्वात लांब टायरमुळे खड्डे सहज चुकवा 

4.       सर्व अपेक्षा पूर्ण करणारे प्रकार:

·         तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार पिकअप, डेलिव्हरी व्हॅन व फ्लॅट बेड यातून योग्य प्रकार निवडा

5.       आधुनिक लिथिअम-आयन बॅटरी:

·         बॅटरीचे आयुष्य 1.50 लाख किमीहून अधिक असल्याने देखभाल-मुक्त राइड

·         सुलभपणे चार्जिंग: ट्रिओ झॉर चार्ज करणे हे मोबाइल फोन चार्ज करण्याइतके सोपे आहे. त्यासाठी केवळ 15AMP सॉकेटची गरज आहे.

6.       न थकता वाहन चालवणे:

·         ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे सहजपणे वाहन चालवा. विन-क्लचआवाजमुक्त व कंपनेमुक्त राइडचा आनंद घ्या.

·         675 mm इतक्या श्रेणीतील सर्वोत्तम ट्रे लोडिंग उंचीमुळे डिझेल कार्गो 3 व्हीलरच्या तुनेलत लोडिंग व अनलोडिंग कालावधी कमी करा

7.       NEMO मोबिलिटी सुविधेसह कनेक्टेड व कार्यक्षम फ्लीट मॅनेजमेंट:

·         वाहनाची रेंजवेगठिकाणइ. दुरूनच पाहण्यासाठी क्लाउड-आधारित कनेक्टेड

8.       स्टायलिश ड्युएल टोनड्रायव्हर-सेंट्रिक डिझाइन:

·         खास ड्युएल टोन बाह्यभाग असणारे आधुनिक डिझाइन वाहन अधिक आकर्षक बनवते

·         गंजमुक्तडेंट-रेझिस्टंट, मोड्युलर एसएमसी पॅनेलमुळे उत्तम अनुभवसुलभ दुरुस्ती व रिप्लेसमेंट

·         अर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या ड्रायव्हर केबिनमुळे व सीटमुळे अधिक आरामदायी

9.       अन्य वैशिष्ट्येटेलिमॅटिक्स युनिट व जीपीएस, विंडस्क्रीन व विपिंग सिस्टिम, स्पेअर व्हील प्रोव्हिजन, ड्रायव्हिंग मोड – एफएनआर (फॉरवर्ड, न्युट्रल, रिव्हर्स), इकॉनॉमी व बूस्ट मोड, लॉकेबल ग्लोव्ह बॉक्स, 12 V सॉकेट, 15-amp ऑफ-रोड चार्जर, हझार्ड इंडिकेटर, रिव्हर्स बझर

10.    उत्तम वॉरंटी व आफ्टरसेल्स:

·         ट्रिओ झॉरबरोबर 3 वर्षे/80,000 किमी अशी स्टँडर्ड वॉरंटी मिळेल 

·         भारतातील 140+ डीलरशिपचे व्यापक जाळे वेळेवर आफ्टर सेल्स सर्व्हिस दिली जाईल याची दक्षता घेते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही

भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे...

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...