Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पिंपरी चिंचवडमधील परिसरात 30 लाखांची वीजचोरी उघडकीस – पिंपरी गावात 672 अवैध वीजजोड तोडले

Date:

पुणे, : पिंपरी विभागात नुकत्याच झालेल्या महावितरणच्या मोहिमेत सांगवी, ताथवडे, चिंचवड, दापोडी, हिंजवडी आदी परिसरात तब्बल 30 लाख 50 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून दुसर्‍या मोहिमेत पिंपरी गावातील विविध ठिकाणचे 672 अवैध वीजजोड पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आले आहे.

दरम्यान, अवैध वीजजोड तोडल्यानंतर अधिकृत वीजजोडणी घेण्यासाठी नागरिकांनी तयारी दर्शविल्याने महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

पिंपरी विभागात सांगवी, ताथवडे, चिंचवड, काळेवाडी, दापोडी, हिंजवडी, वाल्हेकरवाडी या विविध परिसरात विभागस्तरावरून वीजमीटर तपासणीची विशेष मोहिम घेण्यात आली व वीजवापर संशयास्पद असणार्‍या 170 वीजमीटरची तपासणी करण्यात आली. यात सुमारे 30 लाख 50 हजार रुपयांच्या विजेची 35 ठिकाणी चोरी तर 3 ठिकाणी अनधिकृत वापर उघडकीस आला.

यासोबतच खराळवाडी उपविभागातील पिंपरी गावामध्ये भाटनगर, आंबेडकरनगर लिंक रोड, भीमनगर, पिंपरी भाजीमंडई, सुभाषनगर, आंबेडकर कॉलनी, निराधारनगर आदी परिसरात पोलीस बंदोबस्तात वीजचोरीविरोधी मोहिम राबविण्यात आली. यात 672 ठिकाणी थेट वीजचोरी सुरु असलेले अवैध वीजजोड तोडण्यात आले तर तीन ठिकाणी वीजमीटर असतानाही वीजचोरी सुरु असल्याचे दिसून आले. पोलीस विभागाच्या सहकार्याने झालेल्या या कारवाईत सुमारे 900 ते 1000 नागरिकांनी अधिकृत नवीन वीजजोडणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. महावितरणकडून या नागरिकांना नियमानुसार नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत असून आवश्यक कागदपत्र व अर्ज आदीबाबत माहिती देण्यात आली आहे.

पिंपरी विभागातील या दोन्ही मोहिमेत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर सहभागी झाले होते. तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्ग खडक्कर, धवल सावंत, सतीश सरोदे, मंगेश साळुंके आदींसह सुमारे 95 अभियंते, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...