पुणे-महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्यताई सव्वालाखे यांच्या सूचनेनूसार १९जुलै २०२१ ,सोमवार रोजी महिला काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित केली आहे अशी माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्या संगीता तिवारी यांनी येथे दिली.
त्या म्हणाल्या,कोरोनाच्या काळात महिला काँग्रेसच्या बैठका आँनलाईन होत होत्या तसेच कोरोनाच्या काळात प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सर्व जिल्हा शहर तालुका महिला अध्यक्षा आणि त्यांच्या सहकारी यांनी रस्त्यावर उतरून कामे केली त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे या परीस्थितीमधील सर्व महिला काँग्रेसचे काम,आंदोलने ,मोर्चे,, आगामी येणाऱ्या निवडणूक संबंधी तयारी नियोजन महिला काँग्रेसचे संघटन याबाबत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा ,शहर ,तालुका महीला अध्यक्षा आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून बैठकीत आढावा घेणार आहेत .या बैठकीच्या कार्यक्रमात कोरोनासंबधी सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रमधील जिल्हा आढावा बैठक वेळापत्रक पुढील प्रमाणे
सोलापूर सकाळ १०वाजता,सांगली-११-३९ वाजता, सातारा– दुपारी १२-३० वाजता, यानंतर दुपारी १–३० वेळ राखीव आहे पिंपरी चिंचवड– दुपारी २–३०वाजता,, पुणे ग्रामीण — दुपारी ३–३०वाजता,या नंतर दुपारी ४ -०० वेळ राखीव आहे तर पुणे शहर दुपारी ४–३० वाजता या प्रमाणे महिला काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे