विधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह

Date:

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत चांगल्या प्रदर्शनाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील चांगली कामगिरी पाहता आपल्याला काँग्रेस एवढ्याच समान जागा मिळाव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर मंगळवारी बैठक झाली. त्यामध्येच काँग्रससमोर राष्ट्रवादीने हा प्रस्ताव ठेवला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि ईव्हीएमचा मुद्दा देखील महत्वाचा ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्याचाच दाखला देत राष्ट्रवादीने आघाडीमध्ये सम-समान जागा वाटपाची मागणी केली आहे. आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता ती बदलली आहे असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत म्हटले आहे.

महाराष्ट्रात 288 जागांसाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यावरूनच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999 पासून आघाडी आहे. परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेग-वेगळी लढवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसने 25, राष्ट्रवादीने 20 आणि इतर सहकारी पक्षांनी 3 जागांवरून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यापैकी 4 आणि काँग्रेसने केवळ एका जागेवरून विजय मिळवला. तत्पूर्वी 2014 च्या लोकसभेत काँग्रेसला केवळ दोन आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एकूणच राष्ट्रवादीचा निकाल काँग्रेसपेक्षा चांगला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांच्या सुरक्षेसाठी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे गरजेचे; लाचखोर अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा मुंबई.दि.९: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात...

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर...

महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे केले औक्षण; वारकऱ्यांसमवेत फुगडीचा आनंद

ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम...

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ पुणे, दि. ९ जुलै, २०२६- आषाढी...