विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय सशस्त्र पोलीस दले /केंद्रीय पोलीस संघटनांमधील 490 कर्मचाऱ्यांना वर्ष 2026 साठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर

Date:


उत्कृष्ट कार्याची दखल, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’

मुंबई-

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय सशस्त्र पोलीस दले /केंद्रीय पोलीस संघटनांमधील 490 कर्मचाऱ्यांना वर्ष 2026  साठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर  करण्यात आले आहे. हे पदक उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देणे आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी दिले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ साठी अधिसूचना जारी केली होती. पोलीस दल, सुरक्षा संस्था, गुप्तचर विभाग, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शाखा/विशेष शाखा, केंद्रीय पोलीस संघटना/केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/राष्ट्रीय सुरक्षा गार्ड/आसाम रायफल्स आणि देशभरातील न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील  उत्कृष्ट कामगिरी, तपास कार्यात उल्लेखनीय सेवा, अपवादात्मक कार्यक्षमता, अत्यंत धाडसी गुप्तचर सेवा बजावणाऱ्यांना तसेच न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रात कार्यरत सरकारी वैज्ञानिक म्हणून प्रशंसनीय कार्य करणाऱ्यांना हे पदक देऊन गौरवण्यात येते.

हे पदक दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केले जाते.

पुरस्काराने सन्मानित कर्मचाऱ्यांची यादी गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे – https://www.mha.gov.in (पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र पोलीस दलातील १७ अधिकारी-कर्मचारी आणि न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील एक अधिकारी, अशी एकूण १८ जणांना पुरस्कार

नावपद
कुमार चिंतासहायक पोलीस अधीक्षक
ऋषिकेश रेड्डीपोलीस अधीक्षक
रामेश्वर रेंगेसहायक पोलीस आयुक्त
माणिक बेद्रेपोलीस निरीक्षक
डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डीसहायक पोलीस अधीक्षक
प्रभावती एकुरकेपोलीस निरीक्षक
रितेश आहेरपोलीस निरीक्षक
ईश्वर काटकडेअतिरिक्त पोलीस अधीक्षक
रामचंद्र मोहितेपोलीस निरीक्षक
अश्विनी अभिजित पाटीलपोलीस निरीक्षक
पूजा गायकवाडपोलीस उपअधीक्षक

महाराष्ट्राच्या विशेष मोहिमेतील सात मानकऱ्यांमध्ये शिवप्रसाद बाळासाहेब पठारे, अमोल माधव माळी, रामदास तात्याबा कदम, स्वप्नील रामदास काळे यांचीही नावे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिका सिंहगडावर उभारणार १०० फुटांचा भव्य भगवा ध्वज

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि मराठा साम्राज्याच्या...

वीरमाता, वीरपत्नींच्या सन्मानासाठी साडेबारा लाखांची तरतूद:श्रीनाथ भिमाले यांची माहिती

‘वंदे मातरम् १५०’ उपक्रमासाठी स्थायी समितीची मान्यता पुणे, ३० :...

पुण्यात ९ लाख ८९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हे शाखा युनिट-१ ची मोठी कारवाई!

कादरभाई चौकाजवळील गोदामावर छापा; कोंढव्यातील २१ वर्षीय तरुणाला अटक,...