क्रेझीबी तर्फे पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी हेडनेक्स्ट ही राष्ट्रीय स्पर्धा
पुणे,– भारतातील अग्रगण्य माइक्रो लॉंडीग प्लॅल्टफॉर्म म्हणजेच . क्रेझीबी आता पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हेडनेक्स्ट स्टर्टअप फेस्ट २०१८ हे सक्षम व्यासपीठ उपलब्ध करण्याची योजना आखत आहे. हे फेस्ट विद्यार्थ्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासास सुरवात करण्यासाठी निश्चीत मार्गदर्शक ठरेल.
हेडनेक्स्ट प्रमुख्याने एक विद्यार्थी-केंद्रित फेस्ट आहे. क्रेझी बी आणि डब्ल्यूपीएस यांच्या संयुक्ताने होणारे ह्या फेस्टचा मुख्य उद्येश्य आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करने. क्रेझीबी भारतातील पहिले विद्यार्थी-केंद्रित स्टार्टअप फेस्ट, भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि विद्यार्थ्यांसाठी पहिले ऑनलाईन इन्सटॉलमेंट स्टोअर आहे.
एमआय-इनक्यूबेटर आणि किंग्सॉफ्ट (डब्ल्युपीएस) हेडनेक्स्टचे प्रायोजक आहेत, याचबरोबर ते क्रेझी बीचे प्रोग्रॅम आणि टेक्नॉलॉजी पार्टनर्स देखील आहेत. वीलाईक हेडनेक्स्टचे अधिकृत मीडिया पार्टनर आहे . हेडनेक्स्ट ही राष्ट्रीय स्पर्धा आहे ज्यामध्ये पुणे आणि मुंबईच्या ४८० महाविद्यालयांचा समावेश आहे.
क्रेझी बी वेस्ट इंडिया मध्ये १५०० पेक्षा जास्त महाविद्यालयांस सेवा देत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये, ३.५ लाख विद्यार्थ्यांना व ४८० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये सेवा प्रदान करत आहे. हेडनेक्स्ट स्टार्टअप फेस्टने मुख्य विद्यार्थी हब असलेल्या पुण्यास आपले लक्ष बनविले आहे.
हेडएनक्स्टचे संस्थापक, एएमपी आणि क्रेझीबीचे सीईओ मधुसूदन ई. म्हणाले कि, २०१८ च्या हेडनेक्स्ट मध्ये सहभाग घेणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना आपले व्यवसायिक विचार थेट सल्लागार आणि व्हीसीं समोर ठेवुन आपल्या स्टार्ट-अपसाठी निधी मिळविण्यास देखील मदत होईल.
______________________________ _____________________