नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना आज सकाळी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. म्हणजेच आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ४० रुपये कमी मोजावे लागतील. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.१ जानेवारीपूर्वी एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. आजपासून म्हणजे २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला असून ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे, तर घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ आहेत.आजपासून दिल्लीत इंडेन व्यावसायिक सिलिंडर १,७५७ रुपयांना मिळेल, जो यापूर्वी १७,९६.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकात्यात याच १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १,८६. ५० रुपये आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७४९ ऐवजी आता १,७१० रुपये इतकी असणार आहे. १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सुधारित करण्यात आले होते. तर यापूर्वी १६ नोव्हेंबरला करवा चौथच्या दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी महागला होता.