अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजन; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
पुणेः राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाइन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या या सामाजिक आवाहनाला विद्यार्थ्यांनीही उदंड प्रतिसाद देल्याने या शिबिरातून तब्बल १५० रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर डॉ. रजनीश कौर सचदेव बेदी, डॉ. विपुल दलाल, डॉ. वीरेंद्र शेटे, डॉ. सुदर्शन सानप, डॉ सूराज भोयर, एनसीसी समन्वयक मेजर सुमन कुमारी, एनएसएस समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा. डॉ. हनुमंत पवार, प्रा. डॉ. सचिन पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, सर्व कार्यक्रम आधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रत्येक मान्यवराने रक्तदानाचे महत्व विशद करताना, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधीलकीचे भरभरून कौतुक केले. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करून महाविद्यालयीन जिवनात आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.