पुणे:आंबेडकरी चळवळीला काव्य आणि गायनातून अपूर्व योगदान देणाऱ्या राजानंद गडपायले आणि शांताबाई गडपायले या दांपत्याला शनिवारी अभिवादन कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर प्रांगणात अभिवादन सभा झाली.राहुल शिंदे यांच्या सहकारी मंडळी यांनी गडपायले यांची गीते सादर करून अभिवादन केले.
अभिवादन सभेचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे होते.कार्यक्रमाचे संयोजन सम्यक पुरस्कार समितीच्या वतीने नागेश भारत भोसले आणि सहकाऱ्यांनी केले.अभिवादन सभेचे प्रास्ताविक युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह जांबुवंत मनोहर यांनी केले, राहुल नागटिळक, हेमलताताई भालेराव, प्रदीप दादा चव्हाण, वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष एड. अरविंद तायडे,राहुल डंबाळे,अनिल हातागळे, शकुंतलाताई शेलार , सतीश गायकवाड, यशवंत धनविजय यांनी अभिवादन त्यांच्या कार्याचा उजाळा मांडला.
अभिवादन सभेकरता त्यांच्या घरातील तिन्ही नातवंड,सुना व जवळचे नातेवाईक राजेश राऊतसह इतर नातेवाईक उपस्थित होतेयावेळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे नेते दिलीप कुसाळे, दलित पॅंथरचे नेते अशोक पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे भगवान शिंदे,एड.भाई विवेक चव्हाण, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलचे सुजित यादव, शैलेश मोरे, शाम गायकवाड, सुहास बनसोडे, यशवंत नडगम, सचिन बगाडे, सुवर्णाताई डंबाळे, राजेंद्र चौधरी इ. मान्यवर उपस्थित होते.
अभिवादन सभेचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी केले. तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सम्यक पुरस्कार समितीच्या वतीने नागेश भारत भोसले आणि सहकाऱ्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत गायनाची संधी मिळालेले कवी राजानंद गडपायले यांच्या पत्नी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या गायकीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा गावोगावी जाऊन प्रसार केला अशा शांताबाई राजानंद गडपायले यांची हीअभिवादन सभा होती