पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून पीएमसी कॉलनी, पांडवनगर, वडारवाडी याबरोबरच खिलारेवाडी वसाहत, रामोशीवाडी व गोखलेनगर या भागांमध्ये तब्बल २ कोटी १० लाख रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असून नुकतेच या कामांचे भूमिपूजन शिरोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या अंतर्गत पीएमसी कॉलनी येथे विविध विकास कामे, पांडवनगर डोंगरे हॉल समोर, नरेगल मठ येथे, बसवेश्वर मठ मागे, मयुरेश्वर मित्र मंडळ ८८३ वडारवाडी, चाळ नं ३२ गोखलेनगर आणि रामोशीवाडी येथील न्यूजन मित्र मंडळ, रामोशीवाडी वेताळ झोपडपट्टी, वेताळ मित्र मंडळ येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, रामोशीवाडी येथे कॉंक्रीटीकरण करणे, हेल्थ कॅम्प चाळ नं ३ व ९ येथील नळकोंढाळा दुरुस्त करीत नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, खिलारेवाडी वसाहत भागातील प्लॉट नं १५, प्लॉट नं १७ व नदीपात्रालगत परिसरात विविध विकास कामे करणे, पंचमुखी सेवाभावी ट्रस्ट गोखलेनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
यावेळी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. याशिवाय शिरोळे यांच्या हस्ते जनवाडी, निलज्योती या भागातील कामांचे भूमीपूजन झाले तर डोंगरे हॉल येथे मनपा ‘स्वच्छ’च्या कर्मचारी यांना रेनकोट, हॅन्डग्लोज या विविध वस्तू वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.