राष्ट्रीय – एअर इंडियाने अलीकडेच अत्याधुनिक एअरबस A350 सादर करत दिल्ली-लंडन मार्गावर आपली सेवा वाढविली आहे. त्यानंतर, अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत या विमानसेवेचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. Vihaan.Ai उपक्रमांतर्गत एअरलाइनच्या सध्या सुरू असलेल्या परिवर्तनातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यात लांब पल्ल्याच्या सर्व मार्गांवर प्रवाशांना चांगला अनुभव देण्याचा समावेश आहे.
एअर इंडियाच्या महत्त्वाच्या A350 मध्ये नवीन तीन-श्रेणी व्यवस्थेचा समावेश आहे. बिझनेस क्लासमध्ये पूर्ण-फ्लॅट बेडसह 28 खासगी सूट, अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुधारणांसह प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये 24 जागा आणि इकॉनॉमीमध्ये 264 जागा अत्याधुनिक आहेत.
A350 मधील सर्व सीट्सवर नवीन-जनरेशन Panasonic eX3 इन-फ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि HD स्क्रीन आहे, जी 100+ तासांसाठी विशिष्ट श्रेणीसह 13 आंतरराष्ट्रीय आणि 8 भारतीय प्रादेशिक भाषांमधील जगभरातील 3000 तासांहून अधिक काळ पुरतील, अशी मनोरंजक साधने मुलांसाठी देतात. लवकरच त्याला ऑन बोर्ड वाय-फायचे*ही पाठबळ मिळेल.
बिझनेस आणि प्रीमियम इकॉनॉमीमधील पाहुणे फेरागामो व TUMI द्वारे खास डिझाइन केलेल्या अद्ययावत सुविधा किट, तसेच एअर इंडियाचे नवीन सॉफ्ट उत्पादन – Vista Verve – नवीन चायनावेअर, टेबलवेअर, काचेच्या वस्तू आणि बेडिंगचाही आनंद घेतील.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या मेन्यूसह, अतिथींना उत्तम चवीचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जेवणाचा अनुभव मिळेल. भारत-प्रेरित डिझाइन्ससह चायनावेअरच्या उत्कृष्ट कलेक्शनमध्ये रुचकर पाककृती दिली जाईल.
आपल्या लीगेसी फ्लीटमध्ये सुधारणा करण्यासाठी, एअर इंडियाने त्याच्या A320neo पासून रिफिट प्रोग्राम सुरू केला आहे, जो आधुनिक तीन-केबिन कॉन्फिगरेशनमध्ये बदलला जाईल. रिफिटमध्ये 8 आलिशान बिझनेस क्लास सीट्स, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 24 एक्स्ट्रा-लेग्रूम सीट्स व A320neo वर 132 आरामदायी इकॉनॉमी क्लास सीट्स देण्यात येणार आहेत.
नव्याने आणण्यात आलेल्या या वैशिष्ट्यांमध्ये नवीन सीट, कार्पेट्स, पडदे आणि सूक्ष्म केबिन लायटिंग, प्रशस्त लेगरूम, वाढीव सीट पिच, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरण (PED)धारक आणि यूएसबी पोर्ट यांचा समावेश असेल. एअर इंडिया सध्या नवी दिल्ली, मुंबई, दुबई, लंडन, न्यू यॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोसह प्रमुख आंतरराष्ट्रीय हबमध्ये खास लाउंजसह प्रवासाचा उत्तम अनुभव देत आहेत. हे प्रीमियम लाउंज पाहुण्यांना आराम आणि आलिशानतेचा अत्यंत सुंदर अनुभव देईल. यामुळे प्रवाशांचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जागतिक दर्जाचा प्रवास सुनिश्चित होईल.