- महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे आयोजन ; दोन दिवसीय प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश
पुणे : महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे राज्यातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर रोजी जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये पुण्यासह संगमनेर, धाराशिव, धुळे, नगर, लोणावळा या ठिकाणाहून महिला उद्योजिका प्रदर्शनास सहभागी झाल्या असून विविध प्रकारचे ७५ स्टॉल्स आहेत, अशी माहिती आयोजिका अभिलाषा बेलुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला योगिता सिंघ, अपूर्वा पाटकर, दिशा जोशी, नम्रता जाधव टीकारे आदी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रदर्शन दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे. या दरम्यान मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पधेर्चे देखील आयोजन करण्यात आले आहे. नऊवारी ठसका, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, दोन दिवसीय विनामूल्य गरबा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात नवरात्र आणि दिवाळीसाठी लागणारे कपडे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य लहान मुलांची खेळणी अशा अनेक गोष्टी पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.
‘लाडका ग्राहक योजना’ या अंतर्गत रुपये ५० हजारापेक्षा अधिक खरेदी करतील, त्यांना हिरा गिफ्ट म्हणून मिळणार आहे. तसेच रुपये १५ हजारापेक्षा अधिक खरेदी करतील त्यांना कुबेर की भेट म्हणून देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.