- जीतो अपेक्स इंटरनॅशनलला विजय भंडारींच्या रूपानेसर्वात तरुण अध्यक्ष लाभला हे पुण्यासाठी अभिमानास्पदप्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ प्रदान
पुणे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने जीतो अपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांच्या हस्ते श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ साधना सदन पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.प.पू. गुरुदेव श्री गौतम मुनिजी म.सा., प.पू. श्री चेतन मुनिजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुग्गड, आदेश खिंवसरा, जैन श्रावक संघ साधना सदनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”जैन समाजाच्या मोठ्यासंघटनेच्या जीतो अपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी विजय भंडारी यांची निवड झाली असून, २०२४ ते २०२६ या कालावधीत ते काम पाहणार आहेत. जीतो अपेक्स श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष, जीतो पुणेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. जीतोचे भारत देशातील ७० शहरात आणि जगभरात २९ ठिकाणी चॅप्टर आहेत. ४८ हजार सभासद असलेल्या जीतो संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी विजय भंडारी सांभाळणार आहेत.”
“भंडारीयांनी पेपर इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच सामाजिक क्षेत्रात जीतो संघटनेबरोबर लायन्स क्लब, आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन युगल धर्म संघ, सावली वृद्धाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. लायन्स क्लब इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ चे प्रांतपाल म्हणून २०२३ ते २०२४ या कालावधीत त्यांनी काम केले आहे. लायन्स क्लब्जच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट प्रांतपालपदी नियुक्ती झालेले विजय भंडारी एकमेव लायन आहेत. विशेषतः पुण्यातून मेगा स्केलवरील सामाजिक कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने आयोजन करीत अल्पावधीत जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला,” असे प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी सांगितले.
उद्योग व व्यापार क्षेत्रात जगभरात कार्यरत असलेल्या जैन समाजातील उद्योजक व व्यापारी, महिला व युवा पिढीच्या तसेच जैन संस्थांच्या विकासासाठी प्रामुख्याने काम करेन. तसेच जैन समाजाच्या सर्व पंथांचे गुरुसंत, साधु व साध्वी मसा यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करेन, असे उद्गार विजय भंडारी यांनी काढले. सूर्यदत्त संस्थेने मला सन्मानित केले, याचा आनंद वाटत असल्याचे भंडारी यांनी नमूद केले. सूत्रसंचालन आदेश खिंवसरा यांनी केले.