पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 तारखेची सभा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाची नांदी असा निर्धार महाबैठकीत व्यक्त करण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्याचबरोबर इतर कामांचे देखील लोकार्पण होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा पुणे शहरच्या वतीने महा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येत्या गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका क्रमांक एकवरील स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे. त्यासोबतच विविध प्रकल्पांचे लोकार्पण यावेळी होते आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेज) मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तयारीसाठी रविवारी संध्याकाळी पुणे शहरातील पक्षाच्या सर्व आमदारांची, भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महाबैठक महालक्ष्मी लॉन्सला झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमांबद्दल सविस्तर नियोजन करून जबाबदारीचे वाटपही करण्यात आले. दीड हजाराहून अधिक प्रतिनिधी या महाबैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांची पुण्यातील सभा ही कायमच उत्साहात, चैतन्यात आणि नव्या ऊर्जेमध्ये होत असते. यावेळीही त्याच पद्धतीने ही सभा घेण्यात येणार आहे. या बैठकीला पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,राज्यसभेतील खासदार मेधा कुलकर्णी,आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,माजी मंत्री दिलीप कांबळे, वर्षा डहाळे, पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे,शरद बुट्टे पाटील, शहराचे सर्व सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष, पक्षाचे सर्व माजी नगरसेवक यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. पुणे जिल्ह्यासाठी विविध प्रकल्प दिले आहेत. आपले नेते देशाचं नेतृत्व करताना सर्वाधिक काळ प्रवास करत असतात. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता पुण्यातील सभा ही न भुतो न भविष्यती सभा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया प्रभावीपणे वापरला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी; विरोधकांचे चुकीचं नॅरेटिव्ह खोडून काढलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशातील काही महानगरं अभ्यास केला पाहिजे. राजकोट, इंदौर सारख्या महापालिकेत भाजपा सातत्याने निर्विवाद वर्चस्व मिळत आहे. एक विधानसभा पदं पाहिली तर 900 संख्या होते. प्रत्येक कार्यकारीणी पाहिली तर सरासरी एक हजार संख्या आहे. अशा लोकांनी पाच लोकांना आणलं तर ही संख्या 40 हजार होईल. पुणे शहराने अशी आपली ताकद वाढवली पाहिजे.ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 130 विधानसभा मतदारसंघात ही अतिशय उत्तम मताधिक्य मिळाले. अजून थोडे प्रयत्न केले तर 160 संख्या पोहोचू शकतो. महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात देखील 4 जागा महायुती विजयी झाली आहे. आगामी काळात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही विजय मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, नियोजनाच्या बैठकीचे स्वरुप हे एवढं मोठं असेल, तर ही बैठक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सभा म्हणजे निवडणूक जिंकण्याचं साधन आहे. बिगर भाजपा शासित राज्यात आज आराजक सदृश्य परिस्थिती आहे. केंद्रात पुणे शहराला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळत आहे. कालच नितीन गडकरी यांनीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय महत्वाचा आहे. मोदीजी येणार म्हटल्यावर पुणेकर मोठ्या उत्साहाने सभेला येतीलच. भाजपा कुठे कुठे पोहोचू शकतो, याचा सर्वांनी विचार करावे. मोदीजी व्यस्ततेतून पुण्याला वारंवार वेळ देतायत. लांबून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळेत सभा स्थानी पोहोचावे, असं आवाहन केलं.
धीरज घाटे म्हणाले की, पुणे शहराची मोठी परंपरा असून, एखाद्या कार्यक्रमापूर्वी नियोजनाची बैठक झाली, की सर्व कार्यकर्ते अतिशय झोकून देऊन काम करुन; तो यशस्वी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दौऱ्यानिमित्त काही लाख कुटुंबांच्या घरापर्यंत पोहोचता मिळते. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने 100 घरापर्यंत जाऊन निमंत्रण द्यावे.पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असल्याने ही सभा न भुतो न भविष्यती यशस्वी होईल, अशी भावना व्यक्त केली. तसेच, लोकसभेचा अनुभव पाहता, माननीय मोदीजींची विधानसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.