पुणे- वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे ही केवळ शिक्षण संस्था नाही तर जगभरातील शैक्षणिक संस्थेचा ब्रँड आहे. विद्यार्थ्यांना नवी आणि निखळ जीवनदृष्टी देण्याबरोबरच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनातील नवी प्रयोगशीलता आणि सृजनशीलता, आदर्श आचार आणि विचारांचा परिचय देणारी हि संस्था आहे, असे वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेचे सह-संस्थापक अनुज अग्रवाल यांनी सांगितले. पुण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल कॅम्पसमध्ये आपला पहिला स्थापना दिवस साजरा केला.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वेलिंग्टन कॉलेज यूकेचे संस्थापक संचालक सर अँथनी शेल्डन, पंचशील रिॲलिटीचे संचालक रेशम चोरडिया, डॉ. मर्रे टॉड संस्थापक मास्टर, फ्रेंड्स ऑफ वेलिंग्टन ग्रुपचे सदस्य रॉबिन शहा, विद्यार्थी प्रतिनिधी मायला हेकाला उपस्थित होते.
अनुज अग्रवाल म्हणाले की, शाळेच्या संस्थापकांनी त्यांच्या दूरदृष्टीने तसेच समर्पण आणि चिकाटीने संस्थेचा मजबूत पाया तयार केला असून याचा फायदा विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या ज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी, प्रयोगशीलता, कल्पकता, ज्ञानमत्ता आणि कौशल्य असलेले शिक्षक याठिकाणी आहे. फक्त हुशार विद्यार्थी न घडवता एक अष्टपैलू विद्यार्थी तयार करण्याचे ध्येय संस्थेचे आहे. त्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये आयबीडिपी अभ्यासक्रम सुरु करण्याचे आमचे ध्येय आहे. प्रत्येकाला मूल्यवान बनविण्यासाठी आणि आपली क्षमता ओळखण्यास सक्षम बनविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.
दयाळूपणा, धैर्य, सचोटी, जबाबदारी आणि आदर हेच वेलिंग्टन कॉलेजचे मूल्य आहेत. सर अँथनी सेल्डन यांनी १५ वर्षांपूर्वी वेलिंग्टन कॉलेज यूकेने जागतिक स्तरावर जाण्याचा निर्णय कसा घेतला यावर प्रकाश टाकला आणि डब्ल्यूसीआयपीचे यशस्वी वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले.
शाळेचे संस्थापक मास्टर डॉ. मर्रे टॉड म्हणाले, पुण्यातील पहिला संस्थापक दिन साजरा करताना, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. वेलिंग्टन कॉलेजच्या जागतिक नेटवर्कला आकार देण्यासाठी ज्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी महत्त्वपूर्ण ठरली आहे, सर अँथनी सेल्डन यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती आमच्या ध्येयाचे आणि आम्ही उभारत असलेल्या रोमांचक भविष्याचे महत्त्व अधोरेखित करते.”
या कार्यक्रमात एका विद्यार्थीनीचे भाषण देखील झाले. ज्यामध्ये तीने वैयक्तिक अनुभव आणि शाळेचा तिच्या जीवनावर झालेला प्रभाव सांगितला. यामुळे वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुण्याचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला गेला.
वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शाळेची उत्कृष्टता आणि समुदायाची बांधिलकी अधोरेखित केली. शाळा तिच्या मूळ मूल्यांद्वारे आणि त्याच्या समर्पित समुदायाच्या पाठिंब्याने मार्गदर्शित, वाढ आणि यशाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी तयार आहे.