पुणे : आकर्षक फुलांनी सजविलेले शारदा गजानन मंदिर. शारदा गणपतीने परिधान केलेले देखणे भरजरी वस्त्र… गणपती बाप्पा मोरया चा गजर अशा उत्साही वातावरणात शारदा गजाननाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यानी वर्षभर पैसे जमवून तयार केलेले १३ सुवर्णदंत गणरायाला भेट दिले.
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या प्रासादिक मूर्तीचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. तब्बल १३१ किलो वजनाचा केक पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते यावेळी कापण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, जयंत किराड, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांकडून गणरायाला १३ तोळ्याचे सुवर्ण दंत भेट – अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला वर्षभर पैसे जमवून १३ तोळ्याचे सुवर्णदंत वाढदिवसानिमित्त भेट दिले आहेत. कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून जमतील त्या पद्धतीने पैसे जमा करून २४ कॅरेट सोन्यापासून हे सुवर्णदंत तयार केले आहेत त्यावर आकर्षक नक्षीकाम देखील आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांनी गणरायाला १० तोळ्याचे सोन्याचे कडे देखील अर्पण केले होते. याशिवाय यशोधन साखरे यांनी सोन्याचे जानवे आणि गणेश सणस यांनी सोन्याचे बाजूबंद शारदा गजाननाला अर्पण केले.