वैष्णवांच्या सुविधेसाठी धावले महापालिका प्रशासन, अवघ्या काही तासांत पालखी विठोबा मंदिर परिसरातील जागेचे अधिग्रहण

Date:

एक बैठक अन् संपूर्ण महापालिका यंत्रणा लागली कामाला, अवघ्या काही तासांत पालखी विठोबा मंदिर परिसरातील खासगी जागेचे अधिग्रहण

महापालिकेकडून नाना पेठेत अवघ्या काही तासांत जागेचे अधिग्रहण; वारकऱ्यांसाठी वाढणार सुविधा

पुणे (दि ४): विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ९ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर परिसरात दरवर्षी लाखो वारकरी विसाव्यासाठी येत असल्याने जागेची कमतरता जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने तातडीने हालचाली करत नाना पेठेतील दिवेकर कुटुंबाची जागा अवघ्या काही तासांत अधिग्रहित करून मोकळी केली आहे. यापूर्वीच बाजूच्या दोन मिळकतींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून आणखीन एक जागा पालिकेकडे आल्याने यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त प्रशांत ठोंबरे, उपआयुक्त निखिल मोरे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप महाराज, आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य लोंढे महाराज तसेच संबंधित जागामालक व भाडेकरू उपस्थित होते.

बैठकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित जागेचे अधिग्रहण पूर्ण केले. त्यानंतर गणेश बिडकर यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. रात्रीच पाडकाम करून संपूर्ण जागा मोकळी करण्यात आली. त्यामुळे पालखी विठोबा मंदिर परिसर अधिक प्रशस्त झाला असून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजनाला मोठी मदत मिळणार आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया…
“वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भक्ती परंपरेचे प्रतीक आहेत. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात, ही महापालिकेची जबाबदारी आहे. जागेच्या कमतरतेची समस्या लक्षात घेऊन प्रशासन, देवस्थान आणि संबंधित जागामालक यांच्या सहकार्याने अत्यंत कमी वेळात हा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...